सैन्य दलाच्या सन्मानार्थ रांजणगाव गणपती येथे तिरंगा रॅली




प्रतिनिधी अर्जुन शेळके 


भारतीय सैन्य दलाच्या सन्मानार्थ रांजणगाव गणपती येथे शनिवारी तिरंगा रॅली काढण्यात आली. या रॅलीत माजी सैनिकांसह शेकडो तरूण, महिला यांनीही सहभाग घेतला. भारत माता की जयच्या घोषणा देत सहभागींनी भारतीय सैन्य दलाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली.

एस.टी स्टँड ते छत्रपती शिवाजी महाराज पुतळा पासून हनुमान मंदिर ते महागणपती मंदिर अशी रॅली काढण्यात आली होती महागणपती मंदिर येथे रॅली सांगता करण्यात आली . याप्रसंगी सेवावृत्त फौजी यांची भाषणे मनोगत व्यक्त करण्यात आले. तसेच पहेलगाव येथे झालेल्या दहशतवादी हल्यात मृत्यूमुखी पडलेल्या नागरिकांना व सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यात आली याप्रसंगी फौजी माजी सैनिकांचा सन्मान करण्यात आला भा.ज.पा शिरूर बेट मंडल अध्यक्ष सौ. संयोगिताताई पलांडे व उपाध्यक्ष ज्योती पलांडे,कविता ताई गलांडे, स्वातीताई बत्ते आदी महिलांसह भा.ज.प नेते श्रीकृष्ण देशमुख अजित साकोरे माजी अध्यक्ष सतिषदादा पाचंगे, जिल्हाध्यक्ष हर्षददादा जाधव, सरचिटणीस अमोल बोऱ्हाडे, संजय फंड, बजरंग दलाचे सुनील शेळके, नानासाहेब लांडे, गणेश पाचुंदकर आदिनाथ नरवडे,रुपेश भोपत,प्रथम बोरखडे अभिदादा देवकर आदी मान्यवर उपस्थित होते माजी सैनिक संघटना चे अध्यक्ष रामदास लांडे,मेजर महादेव खेडकर, सचिव बुवांनी खेडकर मेजर विलास लांडे अर्जुन शेळके ,मे गोरक्ष गदादे, में शांताराम मांजरे, में गोरक्ष खेडकर, में गौतम शेळके , में छगन चौधरी हे फौजी उपस्थित होते कार्यक्रमाचे सुत्रसंचालन नानासाहेब लांडे यांनी केले व आभार सतिशदादा पाचंगे यांनी केले. भारत माता की जय जय श्रीराम अमर वीर जवान अमर रहे वंदे मातरम् या घोषणांनी परिसर दुमदुमून आला.

कार्यक्रमाचे आयोजन मा. (जिल्हाध्यक्ष विद्यार्थी आघाडी पुणे )

हर्षददादा जाधव,अजित साकोरे यांनी केले.

Post a Comment

Previous Post Next Post