श्री रेणुका माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोवर्धन येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.

 श्री रेणुका माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोवर्धन येथे राजश्री शाहू महाराज यांची जयंती उत्साहात साजरी.



गोवर्धन (ता. रिसोड) – श्री रेणुका माता विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालय, गोवर्धन येथे राजर्षी शाहू महाराज यांची जयंती अत्यंत उत्साहात व प्रेरणादायी वातावरणात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सुबोध वाघ होते. प्रमुख पाहुणे प्रफुल देशमुख तर पर्यवेक्षक म्हणून शलिकराम नागरे आणि अजाबराव अंभोरे उपस्थित होते.


कार्यक्रमाची सुरुवात शलिकराम नागरे यांच्या प्रास्ताविकाने झाली. त्यांनी शाहू महाराजांच्या जीवनकार्याचा व समाजसुधारणेतील योगदानाचा सविस्तर आढावा घेतला. त्यांनी शैक्षणिक समानता, अस्पृश्यता निर्मूलन आणि सामाजिक समतेच्या क्षेत्रात शाहू महाराजांनी उभ्या केलेल्या कार्यावर प्रकाश टाकला.


प्रा. राजेश अंबाडकर यांनी आपल्या भाषणात शाहू महाराजांच्या सामाजिक सुधारणा, समता, शिक्षण हक्क आणि मागासवर्गीय विद्यार्थ्यांसाठी उभारलेल्या वसतिगृहांच्या कार्याचा उल्लेख करत विद्यार्थ्यांना त्यातून प्रेरणा घेण्याचे आवाहन केले. त्यांनी सांगितले की, “शाहू महाराज हे फक्त राजा नव्हते, तर ते समाज परिवर्तनाचे शिल्पकार होते.”


प्राचार्य सुबोध वाघ यांनी अध्यक्षीय भाषणात शाहू महाराजांचे विचार आजही सामाजिक न्याय आणि समतेच्या संदर्भात मार्गदर्शक ठरत आहेत, असे मत मांडले.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश कावरखे यांनी तर आभार प्रदर्शन मनोज अवचार यांनी केले. कार्यक्रमाला विद्यार्थी व शिक्षकवर्गाचा उत्स्फूर्त प्रतिसाद लाभला.कार्यक्रमाच्या यशस्वी ते साठी शिक्षक आणि शिक्षकेतर कर्मचाऱ्यांचे योगदान लाभले.

Post a Comment

Previous Post Next Post