बाबा मला डॉक्टर व्हायचेय.नीट परीक्षेत कौस्तुभ गाजानन सोनुनेची उत्कृष्ट कामगिरी.

 बाबा मला डॉक्टर व्हायचेय.नीट परीक्षेत कौस्तुभ गाजानन सोनुनेची उत्कृष्ट कामगिरी.



वाशिम प्रतिनिधी रामेश्वर इडोळे

:- शासकिय एमबीबीएससाठी पात्र ठरलेला मुंगळा गावातील गुणवंत विद्यार्थी कौस्तुभ गजानन सोनुने याने नीट परीक्षेत उत्तम कामगिरी करत ५५००० हजार सीट्ससाठी भारतातुन जवळपास २३लाख विध्यार्थी भाग घेतात या परिक्षेत ५३८ गुणासह तो १८३३८हा एआय आर पटकावणाऱ्या कौस्तुभ गजानन सोनुने याचा पायदळ दिंडी सोहळा व भजनी मंडळ मुंगळा यांच्या वतीने सत्कार करण्यात आला.




विशेष म्हणजे मागील वर्षी सेमी कॉलेज मध्ये एमबीबीएस ला नंबर लागू नाही बाबा मला डॉक्टर होयायचे आहे.व फक्त आणि फक्त गव्हर्मेंट कॉलेजमध्येच एमबीबीएस करायचे आहे या जिद्दीने कौस्तुभने निकालाच्या दुसऱ्या दिवशी घर सोडले. आणि पुन्हा एकदा नीट च्या अभ्यासाचा खडतड प्रवास संपूर्ण वर्षभरासाठी सुरू केला. अविरतपणे दररोज १४/१५ तास अभ्यास त्यांनी केला. आज तो यशस्वी झाला असला तरी त्यांचा यशाचा प्रवास हा प्रचंड खडतळ व कष्टाचा मेहनतीचा होता त्यांच्या यशाचा गुपित म्हणजे तो तिसरी चौथी पाचवी मध्ये मराठी माध्यमात नवोदय ची तयारी करण्यासाठी दोन वर्ष बाबा शिक्षक असल्याने जिल्हा परिषद उच्च माध्यमिक शाळा गोकसावंगी येथे व एक वर्ष श्री मोरेश्वर विद्यालय मुंगळा येथे शिकाला. याप्रसंगी आपल्या गावातील शिक्षण प्रेमींना एवढेच सांगायचे आहे की मुलाच्या प्रगतीची पायरी, पायाभरणी शिष्यवृत्ती व नवोदय परीक्षा मधून अतिशय चांगल्या प्रकारे होते. शाळेच्या मोठमोठ्या इमारती सुटा बुटातली टीचर आकर्षक कपडे महत्त्वाचे नसून मुलाच्या प्राथमिक शिक्षणाचा दर्जा आहे.या त्याच्या यशामुळे त्याचे सर्वत्र स्वागत होते. अतिशय परिश्रम व कष्ट करून या आव्हानात्मक, चुरशीच्या व आव्हानात्मक स्पर्धा परीक्षेत त्याने दैदिप्यमान यश मिळवले.



 आयुष्यात गोरगरीब आणि गरजु रूग्णांना *सेवाभावी वृत्तीने* वैद्यकीय सेवा देण्याचा मानस कौस्तुभने व्यक्त केला.यावेळी दैनिक सकाळ पत्रकार तथा माजी उपसरपंच अनंता कुटे.म.सरपंच प्रविण वायकर, तसेच भजनीं मंडळ मुंगळाचे रामदास घुगे, भास्कर राऊत, बबन घुगे,मनोज बेलोकर, गजानन नांगरे, विनोद मगर, गजानन घुगे,बाल मृदंगाचार्य रोहण गणेश राऊत त्याच्या यशाचे कौतुक करण्यााठी उपस्थित होते .व उपस्थित सर्वांनी कौस्तुभ गजानन सोनुने याचा शाल व श्रीफळ देऊन सत्कार केला.व सर्वांनी कौस्तुभला भावी उज्वल वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या भावस्पर्शी स्वरूपात हा सत्कार सोहळा कौस्तुतला भावी सफल वाटचालीसाठी नक्कीच सकारात्मक ऊर्जा व प्रेरणा देईल यात शंका नाही. जन्मभूमीत अत्यंत उत्कृष्टपणे हा सोहळा आयोजित करून सर्वांनी कौस्तुभचे कौतुक केले..... त्याच्या यशामागे वडील गजानन सोनुने, तसेच आई.मुंक्ता सोनुने, तसेच आंजी व बहिणीने भरपूर सहकार्य केले.मुंगळा परिसरात नव्हेतर मालेगाव तालुक्यात कौस्तुभ चे कौतुक होत आहे...

Post a Comment

Previous Post Next Post