श्री बाबीर विद्यालयात प. पु.आनंदाश्रम स्वामी महाराज व संत बाळूमामा पायी दिंडी पालखी सोहळा उत्साहात संपन्न.

 श्री बाबीर विद्यालयात प. पु.आनंदाश्रम स्वामी महाराज व संत बाळूमामा पायी दिंडी पालखी सोहळा उत्साहात संपन्न.


 रुई तालुका इंदापूर येथील श्री बाबीर विद्यालयात आज आनंदाश्रम स्वामी महाराज  व संत बाळूमामा यांची पायी दिंडी मासाळवाडी -धारकडवाडी - फुलेवाडी तालुका श्रीगोंदा जिल्हा अहिल्यानगर वरून रुई या ठिकाणी  आल्यानंतर श्री बाबीर विद्यालयातर्फे विद्यालयाचे मुख्याध्यापक जगन्नाथ पाटील व पर्यवेक्षक धनाजी गावडे व जेष्ठ शिक्षक सुनील दराडे, शिक्षकेतर संघटनेचे तालुकाध्यक्ष दत्तात्रय काळे, शिक्षिका सौ. मीरादेवी पाटील,व सौ. प्रतीक्षा पाटील तसेच सर्व शिक्षक -शिक्षिका, आणि कर्मचारी व विद्यार्थी मोठ्या संख्येने  वारकरी ड्रेस परिधान करून या दिंडी सोहळ्यामध्ये सहभागी झाले होते.विद्यालययात आल्यानंतर त्यांचे  टाळ मृदुंगाच्या गजरामध्ये  विद्यालयाचे मुख्याध्यापक व तालुका मुख्याध्यापक संघाचे अध्यक्ष जगन्नाथ पाटील यांच्या हस्ते भालचंद्र मासाळ,बापू मासाळ, विजू नागवडे,भाऊ मासा,विणेकरी सुभाष शेंडगे,बाळासो केकडे, वैभव मासाळ इत्यादी आलेल्या वारकऱ्यांचा  सत्कार करण्यात आला. यावेळी आज सेवानिवृत्त होणारे ज्ञानदेव पिसे महाराज यांनी पकवाज वाजवत व सर्व मुलींनी आणि मुलांनी टाळ वाजवत, फुगड्या खेळत या दिंडीचे स्वागत केले.

Post a Comment

Previous Post Next Post