राजकीय जोडे बाजूला ठेवून महामानवाच्या पुतळ्यासाठी काम करण्याचा पुतळा पुनर्वसन समितीचा संकल्प,

 राजकीय जोडे बाजूला ठेवून महामानवाच्या पुतळ्यासाठी काम करण्याचा पुतळा पुनर्वसन समितीचा संकल्प,  



प्रतिनिधी शामराव जगताप

पुरंदर : भारतीय संविधानाचे निर्माते विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समीतीची बैठक पुतळा पुनर्वसन समितीचे अध्यक्ष तथा जेजुरी नगरपरिषदेचे माजी नगराध्यक्ष अविनाश भालेराव यांच्या अध्यक्षतेखाली सासावड येथे संपन्न झाली, यावेळी राजकीय जोडे बाजूला ठेवून महामानव

विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासाठी काम करण्याचा संकल्प विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा पुनर्वसन समितीच्या बैठकीत करण्यात आला

      यावेळी पुतळा पुनर्वसन समितीचे उपाध्यक्ष विष्णूदादा भोसले, सचिव तानाजी भालेराव पुतळा पुनर्वसन समितीचे विश्वस्त सुनिलतात्या धिवार, सुनिल जगताप , आनंदराव घोरपडे गुरुजी, ज्ञानोबा वाघमारे शशीभाऊ गायकवाड, बळीराम सोनवणे, सोपानराव रणपिसे विनायक गायकवाड गोविंद जगताप कैलास धिवार, अमोल जगताप , अमोल लोंढे,राहुल गायकवाड, कालीदास उबाळे, सुधीर शेलार, बाळासाहेब पोळ, मनोज भिसे, विशाल पेटकर रोहीणीताई कुंभारकर, स्वप्निल पाटोळे, रंजित भालेराव, असिफभाई शेख, निखिल आढाळगे, सुरज आढाळगे, विनोद रणपिसे अनिरुद्ध दोडके, यांसह विविध मान्यवर उपस्थित होते, 


     जेजुरी येथील विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचा पुतळा रस्ता रुंदीकरणात १४ जून २०२४ रोजी प्रशासनाने काढून टाकला या घटनेला १ वर्षं पूर्ण झाले आहे, त्यामुळे पुतळ्याचे काम जलदगतीने करण्यासाठी काय उपाययोजना करणे आवश्यक आहे यावार चर्चा करण्यात आली, पुतळा पुनर्वसन समितीचे अध्यक्ष अविनाश भालेराव यांनी पुतळा परीसर सुशोभीकरण व पुतळा बसविण्या पर्यंत प्रशासनाने केलेल्या अंदाज पत्रकाची माहिती दिली यावेळी जेष्ठ नेते आनंदराव घोरपडे गुरुजी सुनिलतात्या धिवार शशीभाऊ गायकवाड, सोपानराव रणपिसे, बळीराम सोनवणे राहुल गायकवाड कैलास धिवार यांनी चर्चेत सहभाग घेऊन मार्गदर्शन केले, 

विष्णूदादा भोसले यांनी प्रास्ताविक माहिती दिली तर पुतळा पुनर्वसन समितीचे सचिव तानाजी भालेराव यांनी उपस्थितांचे आभार मानले.

Post a Comment

Previous Post Next Post