श्री संत गजानन महाराज पालखीचे वाशिम जिल्ह्यात दमदार आगमन व भव्य स्वागत
वाशिम प्रतिनिधी रामेश्वर इंगोले
मेडशी : शेगांव येथून दर वर्षी श्री संत गजानन महाराज यांची पालखी आषाढी एकदशी करिता पंढरपूर कडे जात असते. या वर्षी पालखीचे हे 56 वर्ष असून या वर्षी पालखीचं प्रस्थान झाल्या नंतर अकोला वाडेगांव पातूर मार्गे मेडशी ला 8 जून रोजी सकाळी 9 वाजताच्या वाशीम जिल्ह्यात प्रवेश केला. तेथे अकोला येथील राजे शिवछत्रपती मंडळ शास्त्री नगर अकोला यांच्या वतीने फराळ व दूध व थंडपेय याचे श्री संत गजानन महाराज पालखी मधील वारकऱ्यांना वाटप करण्यात आले याकरिता अकोला येथील पिंटू टेकाडे निलेश कपाले निलेश पवित्रकार बबलू वाघमारे व राजे शिवछत्रपती मंडळ शास्त्रीनगर अकोला यांच्या सर्व सदस्यांनी व महिलांनी सेवा दिली तिथून
गावो गावी पालखीचे मोठ्या दिमाखात आणि जलोष्यात स्वागत केले.गावातील महिला,लहान मूल,मोठे माणसं गजानन महाराज ह्यांच्या पालखीचं आगमनाने उल्हान्सून जातात.मेडशी गावात सर्व प्रथम गावाच्या सुरवातीला असलेल्या हनुमान वाडीतील नागरिकांनी पालखीची स्वागत केले.त्या नंतर शिवनेरी चौक येथील युवकांनी, महिलांनी रांगोळी काढून फटाखे फोडून आरती ओवाळून पालखीचे स्वागत केले.तसेच गांधी चौक येथे सुद्धा महिलानी पालखीचे स्वागत करत पुढे सिद्धी विनायक गणेश वेटाळ येथे गेली असता तेथील नागरिकांनी पालखीचे आरती ओवाळून आणि रांगोळी काढून स्वागत केलं. गावात पालखीची प्रवेश होतात टाळ मृदुंगच्या गजरात भाविक तलीन होऊन आणि कीर्तनाच्या आवाजाने सगळं गजानन महाराज भक्तिमय वातावरणात जाते. त्यानंतर श्री संत गजानन महाराज यांची पालखी परिसरातील नागरिकांसाठी वनविभागच्या प्रांगणात थांबून भक्ताकरिता बारी पद्धतीने दर्शनची व्यवस्था केली जाते.तर जिल्हा परिषद शाळेत पालखी मधील वारकरी आणि परिसरातील भविक भक्ताकरिता भोजनाची व्यवस्था मेडशी येथील नागरिकांकडून दरवर्षी करण्यात येते. तसेच या पालखी सोहळ्यात पंचक्रोशीतील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित राहत असतात,त्यामुळे गावाला यात्रेने स्वरूप येत असते.त्यामुळे खेळणी,गांडीची दुकाने सुध्दा थाटमाठात या वेळी आठवडी बाजारात लावली होती.आणि भोजन व आराम केल्या नंतर पालखी पुढे ब्राम्हणवाडा,सुकांडा, कुरळा मार्गे डव्हा येथे मुक्कामी जाते. वाशिम जिल्ह्यात आगमन झाल्या नंतर मालेगांव पोलिस स्टेशनचे ठाणेदार संजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखालीव मेडशी पोलिस चौकीच्या वतीने कडेकोट बंदोबस्त राखत चौख सुरक्षा व्यवस्था बजावली.तर आरोग्य विभागाच्या वतीने सदर पालखीच्या सोबत असलेल्या वारकऱ्यांची विशेष काळजी घेतली.तसेच महसूल कर्माचारी मेडशी मंडळ यांनी सुद्धा उपस्थिती होती.

