शेतातील झुकलेल्या विद्युत पोलची दुरुस्ती करावी वाशीम: तालुक्यात शेतकरी नेते राम इढोळे यांची मागणी




वाशीम: 


महाराष्ट्र राज्य विद्युत वितरण कंपनी अंतर्गत येत असलेल्या सर्व ११ के. व्ही. च्या व एल टी च्या ताराला टाईटपणा देऊन तार ओढून घ्यावे तर झुकलेले पोल सरळ करण्यात यावेत. काही ठिकाणी ११ के.व्ही. चे पोल तर काही ठिकाणी एल टी लाईनचे पोल झुकलेले आहेत.

अशा अनेक शेती भागातील शेतकऱ्यांच्या हितासाठी हिवाळी हंगामा अगोदर ही कामे करणे गरजेचे आहे जर हे कामे रिकाम्या वेळात व होईल त्यावेळी केल्या गेले तर शेतकऱ्यांना हिवाळी हंगामात

त्रास होणार नाही. हिवाळी हंगामात पेरलेल्या पिकाला विद्युत वितरण कंपनीच्या माध्यमातून शेतकऱ्यांना दिलासा मिळेल अशी शेतकऱ्यांना आशा आहे.


कोणतेही काम वेळेत होत नाही, त्या अगोदरच ही कामे केली तर शेतकऱ्यांना कायम दिलासा मिळेल व या केलेल्या कामामधून शेतकऱ्याचे हितच जोपासल्या जाईल. याबाबतचे सर्व आढावे/माहिती आपल्या विद्युत तंत्रज्ञा कडून सर्व माहिती घेऊन पूर्ण करावेत अशी आशा वाशीम तालुक्यातील शेतकरी नेते राम इढोळे व सर्व शेतकऱ्यांना आहे.

Post a Comment

Previous Post Next Post