भारत-चीन सीमेजवळ दुर्दैवी अपघात एक अधिकारी व एक जवान शहीद



प्रतिनिधी-संजय चव्हाण | गलवान सीमेवरून

देशाच्या रक्षणासाठी नेहमी तत्पर असलेल्या भारतीय लष्कराच्या १४ हॉर्स रेजिमेंट (आरमोड कोरची युनिट) ला एक दुर्दैवी घटना सामोरी आली. गलवान सीमेवर गस्तीसाठी जात असताना अचानक डोंगरकड्यावरून पडलेल्या दगडामुळे सैन्याच्या वाहनावर भीषण अपघात घडला. या अपघातात एक अधिकारी आणि एक जवान शहीद झाले.


घटना चीन सीमेलगत असलेल्या अरुणाचल प्रदेशातील अतिशय संवेदनशील भागात घडली. अत्यंत प्रतिकूल हवामान, उंच डोंगराळ भाग, आणि अरुंद वळणदार रस्ते यामुळे या भागातील सैनिकी वाहतूक ही फारच धोकादायक असते. गस्त दरम्यान अचानक वरून मोठा खडक कोसळल्याने लष्करी वाहनाचा मोठा अपघात झाला. यात दोन शूर सैनिकांनी प्राणांची आहुती दिली.


🇮🇳 दैनिक लोकन्या संघर्ष परिवारातर्फे भावपूर्ण श्रद्धांजली

शहिद जवानांच्या बलिदानाला दैनिक लोकन्या संघर्ष परिवार कडून कृतज्ञतेने आणि दुःखाने भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण करण्यात येत आहे. आपल्या देशाच्या सरहद्दीवर, आपल्या कुटुंबापासून हजारो किलोमीटर दूर, हिमालयाच्या कुशीत त्यांनी आपला जीव देशासाठी अर्पण केला — हे बलिदान शब्दांत मावणारं नाही.


देशासाठी शहीद होणं ही केवळ एक घटना नसून संघर्ष, शौर्य आणि पराक्रमाचा सर्वोच्च मान आहे. आम्ही हे बलिदान विसरणार नाही. त्यांच्या कुटुंबियांच्या दु:खात आम्ही सहभागी आहोत.

Post a Comment

Previous Post Next Post