चाळीस वर्षांच्या यशस्वी सेवेचा समारोप : थोरात मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा संपन्न
निमगाव म्हाळुंगी | प्रतिनिधी संजय चव्हाण
गेल्या चार दशकांपासून शिक्षक म्हणून अतुलनीय योगदान देणाऱ्या थोरात मॅडम यांचा सेवापूर्ती सोहळा नुकताच विद्यालयात अत्यंत उत्साहात व सन्मानाने पार पडला.
या विशेष प्रसंगी निमगाव म्हाळुंगी ग्रामपंचायतीचे सरपंच श्री. सचिन बबनराव चव्हाण तसेच मेजर विजय शिवले विशेष उपस्थित होते. दोघांनीही मॅडम यांना मनःपूर्वक शुभेच्छा देत त्यांचं सामाजिक व शैक्षणिक योगदान आहे
थोरात मॅडम यांनी शिक्षक म्हणून चाळीस वर्षे निस्वार्थ, निष्ठा आणि समर्पण भावनेने कार्य करत विद्यार्थ्यांचे भावी आयुष्य घडवले. त्यांच्या कार्यामुळे हजारो विद्यार्थी यशस्वी झाले आहेत. शाळा, गाव आणि समाजात त्यांनी निर्माण केलेला आदर्श आजही सर्वांसाठी प्रेरणादायी ठरत आहे.
कार्यक्रमाच्या अखेरीस त्यांच्या पुढील जीवनासाठी निरोगी, आनंदी व सक्रिय निवृत्तजीवनाची शुभेच्छा देण्यात आल्या.
