सतरा वर्षांनंतरचा गेट-टुगेदर अडोळी येथे उत्साहात साजरा




अडोळी, प्रतिनिधी रामेश्वर इडोळे 

नागसेन विद्यालय, अडोळी येथे शालेय विद्यार्थ्यांचा गेट-टुगेदर कार्यक्रम नुकताच मोठ्या उत्साहात पार पडला. विशेष म्हणजे, या भेटीला तब्बल सतरा वर्षांनंतरचे जुने वर्गमित्र एकत्र आले होते. दि. ८ ऑगस्ट रोजी सकाळी ११ वाजता आयोजित केलेल्या या कार्यक्रमात जुन्या आठवणींना उजाळा देत एक अनोखा अनुभव सर्वांनी घेतला.


या कार्यक्रमाचे नियोजन राम इढोळे आणि सुकेशनी पट्टेबहादूर यांनी केले होते. त्यांनी संपूर्ण आयोजन अत्यंत नेटकेपणाने व उत्साहाने पार पाडले. या कार्यक्रमाला नागसेन विद्यालयाचे सर्व शिक्षकगण, विद्यमान विद्यार्थी आणि अनेक माजी विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.


कार्यक्रमात जुने फोटो, आठवणींच्या गोष्टी, शालेय जीवनातील किस्से, आणि भावनिक क्षण यांची रेलचेल होती. उपस्थितांनी शिक्षकांचे आभार मानत त्यांच्या मार्गदर्शनाची आठवण काढली. काही विद्यार्थ्यांनी आपल्या यशोगाथा सांगत नव्या पिढीला प्रेरणा दिली.


कार्यक्रमाचा शेवट गोडधोड जेवणाने व गप्पाटप्पांनी झाला. उपस्थितांनी अशी गेट-टुगेदर नियमित होण्यासाठी आग्रह व्यक्त केला.

Post a Comment

Previous Post Next Post