जय जवान माजी सैनिक संस्थेत ७९ वा स्वातंत्र्य दिन उत्साहात साजरा
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर, जि. पुणे) – स्वतंत्र भारताचा अमृत महोत्सव व ७९ वा स्वातंत्र्य दिन निमित्त जय जवान माजी सैनिक संस्था, निमगाव म्हाळुंगी येथे शुक्रवारी (दि. १५ ऑगस्ट) सकाळी सात वाजता ध्वजारोहण सोहळा उत्साहात पार पडला.
या सोहळ्यासाठी शिरूर तालुक्याचे माजी आमदार सूर्यकांत पलांडे, गावातील सचिव, अध्यक्ष-उपाध्यक्ष चंद्रकांत आबा चव्हाण, तसेच पुणे जिल्हा परिषदेचे सभापती रावसाहेब करपे, उपसभापती रणसिंग ताई, कृषी अधिकारी, ग्रामपंचायत सरपंच डॉ. सचिन चव्हाण पाटील, उपसरपंच पवार साहेब, पोलीस पाटील यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.
सकाळी प्रभात फेरी काढण्यात आली. त्यानंतर विद्या विकास मंदिर आणि ग्रामपंचायत प्राथमिक शाळेत शालेय ध्वजारोहण करून विद्यार्थ्यांनी देशभक्तीपर कार्यक्रम सादर केले. संस्थेच्या आवारात झालेल्या मुख्य कार्यक्रमात ध्वजारोहण सैनिक व मान्यवरांच्या हस्ते पार पडले.
यावेळी गावातील अधिकारी, पदाधिकारी, सभासद व ग्रामस्थांचा सत्कार करण्यात आला. अध्यक्ष रामचंद्र विधाटे, उपाध्यक्ष मेजर शिवले, सचिव चंद्रकांत आबा चव्हाण आणि संघटक मेजर संजय चव्हाण यांनी उपस्थितांचे स्वागत केले.
कार्यक्रमात “जय जवान जय किसान” या घोषणांनी परिसर दुमदुमून गेला.
