श्री क्षेत्र रांजणगाव महागणपतीला प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांची भेट




प्रतिनिधी : अर्जुन शेळके


राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे प्रदेशाध्यक्ष शशिकांत शिंदे यांनी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती चरणी भेट देऊन श्रींच्या दर्शनाचा लाभ घेतला. त्यांच्या हस्ते महाआरतीही करण्यात आली.


या प्रसंगी श्री क्षेत्र रांजणगाव महागणपती देवस्थान ट्रस्ट व पै. अक्षयकुमार महाराज नाणेकर (संस्थापक अध्यक्ष, महाराज ग्रुप) यांच्या वतीने शिंदे यांचा महागणपती प्रतिमा, शाल, श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला.


शिंदे यांनी पक्षाच्या उज्ज्वल भविष्यासाठी प्रार्थना करताना नवतरुणांना पक्षामध्ये संधी देण्यावर विशेष भर दिला. "नवतरुणांच्या क्षमतेला दिशा देण्यासाठी पक्ष कटिबद्ध आहे," असे ते म्हणाले. तसेच, मा. देवदत्तजी निकम साहेबांच्या मार्गदर्शनाखाली शिवविचारांचा युवा चेहरा म्हणून काम करणाऱ्या कुमार महाराज नाणेकर यांच्या पाठीशी मी खंबीरपणे उभा आहे, असा उल्लेखही त्यांनी केला.


यावेळी शिरूर-आंबेगाव विधानसभा तालुका अध्यक्ष शेखरदादा पाचुंदकर पाटील, मेजर किशोर टावरे, मुख्य विश्वस्त ओमकार देव, ग्रामपंचायत सदस्य निलेश लांडे, शिरूर तालुका ग्रंथालय संघ अध्यक्ष विवेकानंद फंड, कुणाल वर्पे, देवस्थानचे व्यवस्थापक पांडुरंग चोरगे, जि.प. रांजणगाव गणपती गटातील कार्यकर्ते तसेच असंख्य पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.


महागणपती देवस्थानच्या विविध उपक्रमांविषयी आणि भाविकांसाठी उपलब्ध करून दिलेल्या सोयी-सुविधांविषयी समाधान व्यक्त करत शिंदे यांनी देवस्थान समितीचे कौतुक केले.


या भेटीमुळे स्थानिक कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, आगामी काळातील पक्ष संघटनेसाठी ही भेट महत्त्वपूर्ण ठरणार असल्याचे स्पष्ट झाले.

Post a Comment

Previous Post Next Post