ह.भ.प. नानासाहेब पाचुंदकर यांच्या हस्ते संत बाळूमामा पालखी सोहळ्यासाठी बोलेरो गाडी अर्पण




प्रतिनिधी : अर्जुन शेळके


रांजणगाव गणपती :

संत सद्गुरू श्री बाळूमामा महाराजांचा भव्य भंडारा महोत्सव व पालखी दर्शन सोहळा रांजणगाव गणपती येथे मोठ्या भक्तीभावाने पार पडला. सलग तीन दिवस चाललेल्या या सोहळ्याला महाराष्ट्रभरातून लाखो भाविकांनी उपस्थित राहून दर्शनाचा लाभ घेतला.


सोहळ्याचे संपूर्ण नियोजन व जबाबदारी शिरूर-आंबेगाव तालुका राष्ट्रवादी युवक काँग्रेस विधानसभा अध्यक्ष मानसिंग पाचुंदकर यांनी सांभाळली. भक्तांसाठी सायंकाळी कीर्तन व त्यानंतर महाप्रसाद, सकाळी आरती व महाप्रसाद अशा भव्य कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते.


या सोहळ्यात सुप्रसिद्ध कीर्तनकारांनी उपस्थिती लावली. त्यामध्ये ह.भ.प. वैष्णवीताई महाराज महारनूर, ह.भ.प. विक्रम सूर्यकांत जगताप व ह.भ.प. युवा कीर्तनकार गुरुदास महाराज जगताप यांनी कीर्तनरूपी सेवा दिली.


दरम्यान, पालखी सोहळ्या साठी अदमापूर येथील संत बाळू मामा संस्थान यांना नवीन बोलेरो गाडी ह.भ.प. श्री नानासाहेब पाचुंदकर यांनी अर्पण केली. या वेळी उपस्थित मान्यवरांमध्ये भीमाशंकर साखर कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रदीपदादा वळसे पाटील, शिरूर तालुक्याचे म आमदार पोपटरावजी गावडे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे माजी सभापती प्रकाश पवार, तालुक्याचे भूषण पत्रकार नितीनजी बारवकर, प्रा. माणिक खेडकर सर, उपसरपंच श्रीकांत पाचुंदकर तसेच विविध विकासकारी चेअरमन गोरक्ष गदादे व्हाईस चेअरमन कैलास लांडे संचालक, सरपंच व ग्रामपंचायत सदस्य आदी मान्यवरांनी उपस्थित राहून पालखी कारभाऱ्यांचा सत्कार केला.


सोहळ्यादरम्यान पाचुंदकर कुटुंबीयांच्या शेतात थांबलेली माय-माऊली मेंढी दर्शनासाठी भाविकांसाठी आकर्षणाचे केंद्र ठरली.


भव्य व दिव्य स्वरूपात पार पडलेल्या या सोहळ्याचे जिल्हाभरातून कौतुक होत असून पालखी कारभारी यांनी ह.भ.प. नानासाहेब पाचुंदकर व उद्योजक मानसिंग भैया पाचुंदकर यांचे मनःपूर्वक आभार मानले

Post a Comment

Previous Post Next Post