श्रावणातील चौथ्या सोमवारी कवठा येथील शिवमंदिरात गाभाऱ्याची फळसजावट

 श्रावणातील चौथ्या सोमवारी कवठा येथील शिवमंदिरात गाभाऱ्याची फळसजावट



कवठा (ता. नेवासा):

श्रावण महिन्यानिमित्त नेवासा तालुक्यातील कवठा येथील प्राचीन शिवमंदिरात धार्मिक वातावरण निर्माण झाले आहे. श्रावणातील चौथ्या सोमवारी ग्रामस्थांच्या वतीने विविध पूजाअर्चा, अभिषेक व अलंकारांनी महादेवाची विशेष पूजा करण्यात आली. या पूजन कार्यक्रमाचे आयोजन सरपंच गजभार यांच्या पुढाकाराने करण्यात आले.


पूजेनंतर मंदिराच्या गाभाऱ्याला फळांची आकर्षक सजावट करून भक्तांचे लक्ष वेधून घेणारा देखावा उभा करण्यात आला. केळी, सफरचंद, डाळिंब, द्राक्षे, संत्री अशा अनेक प्रकारच्या फळांचा वापर करून गाभारा सुंदररीत्या सजवण्यात आला होता.


या दिवशी मंदिरात दर्शनासाठी सकाळपासूनच भाविकांची गर्दी पाहायला मिळाली. महिला, पुरुष आणि लहानग्यांनी हर हर महादेवच्या घोषात महादेवाचे दर्शन घेतले. संपूर्ण परिसर भक्तीमय वातावरणात न्हालेला होता.


गावकऱ्यांच्या सहभागाने आणि श्रद्धेने सजलेला हा कार्यक्रम श्रावणातील भक्तिभावाचा अनोखा अनुभव देणारा ठरला.

Post a Comment

Previous Post Next Post