प्रेरणादायी कार्य:नैसर्गीक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकरी कुटुंबाला 'मदतीचा हाथ'केवळ आश्वासन न देता कृतीयूक्त मदत

 प्रेरणादायी कार्य:नैसर्गीक आपत्तीमुळे खचलेल्या शेतकरी कुटुंबाला 'मदतीचा हाथ'केवळ आश्वासन न देता कृतीयूक्त मदत




मंगरूळपीर:-वाशिम जिल्ह्यात झालेल्या अतिवृष्टीमुळे शेतकर्‍यांचे पिक पाण्यात जावुन अतोनात नुकसान झाले अशा परिस्थीतीत शेतकर्‍यांच्या जिव्हाळ्याचा पोळा सण कसा साजरा करावा या चिंतेत सध्या शेतकरी आहेत.शासन प्रशासन,लोकप्रतिनीधी केवळ मदतीचा आव आणतात पण प्रत्यक्षात कृतीयूक्त मदत होतांना दिसत नाही अशा परिस्थीतीत सामाजिक आणी सेवाभाव दृष्टीकोणातुन पोळ्याच्या पर्वावर स्वासिन येथील शेतकरी कुटुंबाला सामाजिक कार्यकर्ते तथा फुलचंद भगत व संत गाडगेबाबा आपत्ती व बचाव पथकाचे अतुल उमाळे आणि त्यांच्या परिवाराने स्वतः शेतकर्‍यांच्या बांधावर जावुन शेतकरी कुटुंबाला छोटीशी भेट म्हणून धोतर,शेला,टोपी,लुगडे देवुन व पेढा भरवुन पुजा करुन बैलपोळ्याच्या पर्वावर हा कृतीयूक्त सेवाभावी ऊपक्रम पार पाडला.

                 मागील काही दिवसांपासून सुरू असलेल्या मुसळधार पाऊस आणि पुरामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान झाले आहे. अनेक ठिकाणी शेती पाण्याखाली गेली आहे, ज्यामुळे उभ्या पिकांची नासाडी झाली आहे. या गंभीर परिस्थितीमुळे शेतकरी आर्थिक संकटात सापडले आहेत.प्रशासकीय अधिकारी आणी लोकप्रतिनीधी केवळ पाहणीचा देखावा करुन फोटोशेशन करत आहेत प्रत्यक्षात मदत माञ काहीच नाही.पुरामुळे बाधित झालेली शेतीपीके आणि जनावरे यांसाठी शेतकऱ्यांना तात्काळ मदत देण्यासाठी घोषणांचा आणी आश्वासनांचा पाऊस सुरु आहे.अशातच शेतकर्‍यांचा जिव्हाळ्याचा सण बैलपोळा आला त्यामुळे निसर्गाच्या अवकृपेने हिरावलेले स्वप्न आणी हातातोंडांशी आलेला घास घेल्याने बळीराजा चिंताग्रत असतांना प्रत्यक्ष कृतीयूक्त मदत करण्यासाठी सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत आणी अतुल ऊमाळे सरसावले.ते स्वतः परिवारासह नुकसानग्रस्त पिडित शेतकर्‍यांच्या बांधावर जावून परिस्थितीशी दोन हात करण्याचा धिर देत दिलासा दिला.एवढेच नव्हे तर पोळा सण आनंदात साजरा करता यावा यासाठी मंगरुळपीर तालुक्यातील स्वासीन येथील श्यामराव व इंदुबाई राऊत या शेतकरी वृध्द दाम्पत्याला सामाजिक कार्यकर्ते फुलचंद भगत,अतुल ऊमाळे,शारदा ऊमाळे,कृष्णाई ऊमाळे यांच्याकडुन धोतर टोपी,शेला,लुगडं भेट देवुन त्यांची पुजा करुन पेढा भरवत सामाजीक ॠण व्यक्त केले.त्यामुळे शेतकऱ्यांनी घाबरून न जाता खंबीरतेने राहा असा विश्वास दिला.सध्याच्या हवामानामुळे शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे नुकसान होत आहे. सततच्या पावसामुळे अनेक भागांमध्ये पूरसदृश परिस्थिती निर्माण झाली आहे. या नैसर्गिक आपत्तीमुळे खरीप पिके आणि फळबागांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसला आहे.या गंभीर परिस्थितीची दखल ठोस मदत करुन कुणीही घेतली नाही.नुसती पाहणी,आश्वासनांची खैरातच वाटली परंतु नेहमी सेवाभाव कार्यात अग्रेसर असलेल्या सामाजीक कार्यकर्ते फुलचंद भगत आणी अतुल ऊमाळे यांच्या कृतीयूक्त मदतीमुळे मदतीचा आव आणणार्‍यांसाठी मोठे ऊदाहरण असुन प्रत्येकांने गरजुंना मदत करण्याची प्रेरणा देते.सरकारने केवळ आश्वासन न देता प्रत्यक्ष मदतीची मागणी होत आहे.

Post a Comment

Previous Post Next Post