अक्षय अशोक गवांडे यांची भारतीय जनता पक्षात "कोषाध्यक्ष" पदावर नियुक्ती

 अक्षय अशोक गवांडे यांची भारतीय जनता पक्षात "कोषाध्यक्ष" पदावर नियुक्ती



 रांजणगाव गणपती -प्रतिनिधी शंकर तिडके

भारतीय जनता पार्टीच्या पुणे जिल्हा उत्तर अंतर्गत शिरूर बेट मंडळामध्ये श्री. अक्षय अशोक गवांडे यांची कोषाध्यक्ष पदावर नियुक्ती करण्यात आली आहे. पक्षाच्या कार्यकारिणीत त्यांना हे महत्त्वाचे पद देण्यात आले असून, ही नियुक्ती पक्षाच्या संघटनात्मक बळकटीसाठी महत्त्वपूर्ण मानली जात आहे.



पक्षाच्या अधिकृत पत्राद्वारे श्री. गवांडे यांना त्यांच्या नवीन जबाबदारीसाठी हार्दिक शुभेच्छा देण्यात आल्या आहेत. त्यांचे अभिनंदन करताना, शिरूर बेट मंडळाच्या अध्यक्षा सौ. संयोगिता तानाजी वळंगे यांनी त्यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा दिल्या आहेत.


या नियुक्तीबद्दल जिल्हाध्यक्ष श्री. प्रदीप विधाधर कंद यांचेही विशेष अभिनंदनपर संदेश दिला गेला आहे.


या संधीद्वारे श्री. अक्षय गवांडे यांनी पक्षाच्या विश्वासाला जागून प्रामाणिकपणे आपले कर्तव्य बजावेल, असा विश्वास कार्यकर्त्यांनी व्यक्त केला आहे.

Post a Comment

Previous Post Next Post