शिरूर तालुक्यात माजी सैनिक पदाधिकाऱ्यांची महत्त्वपूर्ण बैठक
दिनांक : ५ ऑक्टोबर २०२५
शिरूर (प्रतिनिधी-संजय चव्हाण) :
आज दिनांक ५ ऑक्टोबर २०२५ रोजी शिरूर तालुक्यातील बांधकाम समिती सभापती पै. मंगलदास बांदल साहेब व जिल्हा परिषद सदस्या सौ. रेखाताई बांदल यांच्या निवासस्थानी माजी सैनिक पदाधिकाऱ्यांची एक महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. या बैठकीत विविध मुद्द्यांवर सविस्तर चर्चा होऊन महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आले.
१. नवनिर्वाचित राज्याध्यक्षांचा सन्मान
किसान सैनिक फेडरेशन महाराष्ट्र राज्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष सन्माननीय शिवाजी अण्णा कदम यांचा बांदल परिवाराच्या वतीने विशेष सन्मान करण्यात आला.
२. माजी सैनिकांसाठी भूमिपूजनाचा निर्णय
सभापती मंगलदास बांदल यांनी आश्वासन दिले की, भारतीय माजी सैनिक संस्थेने कासारी फाट्यावर घेतलेल्या दोन गुंठे जागेचे भूमिपूजन दिपावलीच्या शुभमुहूर्तावर आमदार मा. माऊली आबा कटके यांच्या उपस्थितीत करण्यात येईल.
३. बांधकामाची जबाबदारी स्वीकारली
नुसते भूमिपूजनच नव्हे तर नवीन वास्तूचे संपूर्ण बांधकाम करण्याची जबाबदारी स्वतःच्या पुढाकाराने स्वीकारण्याचे आश्वासन बांदल साहेबांनी दिले. याबद्दल सैनिक व सैनिक परिवाराच्या वतीने त्यांचे मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.
४. शिरूर नगर परिषदेतील जागेचा मुद्दा
जर किसान सैनिक फेडरेशनचे अध्यक्ष शिरूर तालुक्यातून असतील तर शिरूर नगर परिषदेमध्ये दहा गुंठे जागा मिळवून माजी सैनिकांसाठी स्वतंत्र कार्यालय उभारण्याचे आश्वासनही देण्यात आले."भारत माता की जय" व "छत्रपती शिवाजी महाराज की जय" या घोषणांनी बैठकीचा समारोप झालाउपस्थित मान्यवर :
भारतीय माजी सैनिक संस्था शिरूर : शिवाजी अण्णा कदम, सुभेदार आबा रुके, नंदकिशोर रोडे, शिवाजी नाना कोहकडे, बबनराव फलके, जयसिंगराव गायकवाड, चंद्रकांत लांडगे, सचिन दरेकर, लहू तळवले, सुभेदार सुरेश उमाप.
हुतात्मा विष्णू गणेश पिंगळे संघटना : आनंदराव ढमढेरे, पोपटराव भुजबळ, सुदामराव भुजबळ, जालिंदर ढमढेरे, श्रीरंग ढमढेरे. मेजर संजय चव्हाण
जय जवान माजी सैनिक संघटना, निमगाव म्हाळुंगी : सुभेदार रामचंद्र विधाते, सुभेदार चंद्रकांत चव्हाण, सन्माननीय लक्ष्मण शिवले, सन्माननीय बाबा चव्हाण.मेजर संजय चव्हाण एका फोनवर सर्व पदाधिकारी उपस्थित राहून कार्यक्रमाला दिलेला उत्स्फूर्त प्रतिसाद हा माजी सैनिकांच्या एकतेचा आणि बांधिलकीचा पुरावा आहे. आगामी काळात सैनिकांच्या हिताच्या कार्यासाठी असेच सहकार्य लाभावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली.
– सुभेदार सुरेश उमाप
कार्याध्यक्ष, भारतीय माजी सैनिक संस्था, शिरूर
