श्री. दिपक सोनवणे यांना महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार जाहीर
महाराष्ट्र राज्य शिक्षक लोकशाही आघाडी व माध्यमिक शिक्षक संघा तर्फे दिला जाणारा गुणवंत शिक्षक पुरस्कार सुंदरबाई मराठे विद्यालय, खराडी , पुणे येथील शिक्षक श्री. दिपक काशिनाथ सोनवणे यांना जाहीर करण्यात आला.
श्री. सोनवणे सर यांनी आतापर्यंतच्या १६ वर्षाच्या सेवेत अनेक नवोपक्रम राबवले आहेत .संस्कारक्षम विद्यार्थी घडवले आहेत, तसेच सर शालेय संस्कृतिक कार्यात दरवर्षी हिरीरीने भाग घेऊन त्यातून विद्यार्थी व पालकांना सामाजिक, राष्ट्रीय एकात्मता, देशप्रेम, भावनिक व संवेदनशील संदेश देत असतात... दरवर्षी विद्यालयातील इयत्ता ५ वी स्कॉलरशिप च्या विद्यार्थ्यांना सरांचे मार्गदर्शन लाभत असते अन् त्यामुळेच दरवर्षी विद्यालयाचे विद्यार्थी गुणवत्ता यादीत चमकत असतात... माध्यमिक शिक्षक संघाने सरांच्या याच विविध गुण कौशल्यांना विचारात घेऊन त्यांना या वर्षीचा गुणवंत शिक्षक पुरस्कार २०२५ देण्यात आला.
रविवार, दिनांक २८ सप्टेंबर २०२५ रोजी माननीय श्री. गणेश सोनूने उपायुक्त पुणे मनपा, मा. डॉ. श्री. भाऊसाहेब कारेकर शिक्षणाधिकारी(माध्यमिक )पुणे जिल्हा परिषद, पुणे, श्री. प्रशांत जगताप मा.महापौर पुणे मनपा, श्री. जी. के. थोरात सर अध्यक्ष महाराष्ट्र शिक्षक लोकशाही आघाडी यांच्या हस्ते सरांचा गुणवंत शिक्षक पुरस्कार देऊन सत्कार करण्यात आला, त्याबद्दल श्री. दिपक काशिनाथ सोनवणे सरांचे गेनबा सोपानराव मोझे संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. आ. श्री. रामभाऊ मोझे साहेब, उपाध्यक्ष श्री ज्ञानेश्वर मोझे, शालेय समिती अध्यक्षा श्रीमती अलकाताई पाटील,विद्यालयाचे मुख्याध्यापक श्री. संजय सोमवंशी, पर्यवेक्षक श्री. सुनिल वळसे व सर्व सहकारी शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांच्या वतीने मनःपूर्वक हार्दिक अभिनंदन करण्यात आले.
