रिसोड प्रतिनिधी -अन्सार शेख
रिसोड : राज्यात भाजप सेना सरकार आल्यानंतर विकासाची लाट पसरवलेली गेलेली आहे.पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या विकासात्मक संकल्पनेतून गोरगरिबांना न्याय देण्याचे काम करण्यात आलेले आहे. समृद्धीच्या माध्यमातून वाशिमला मोठ्या महानगराला जोडण्याचं काम भाजप ने केलेले आहे. असे प्रतिपादन महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी रिसोड येथे आयोजित संकल्प सभेत केले आहे. पुढे बोलताना त्यांनी अनंतराव देशमुख यांच्या भाजप प्रवेशाचा उद्देश सार्थ करून त्यांचे सर्व विकासात्मक प्रश्न मार्गी लावू व एका वर्षात तब्बल 25 कोटी रुपये या मतदार संघात खर्च करण्याचा आश्वासने यावेळी फडणवीस यांनी दिले. आज दी. 13 एप्रिल रोजी वाशिम मार्गावर अनंतराव देशमुख व ऍडव्होकेट नकुलदादा देशमुख यांनी आयोजित केलेल्या संकल्प सभेच्या अध्यय स्थानी भारतीय जनता पार्टीचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे हे होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रणधिर सावरकर,आ. लखन मलिक, विधान परिषद आमदार वसंत खंडेलवाल, निलय नाईक, तानाजीराव मुटकुळे आमदार हिंगोली, माजी आमदार विजयराव जाधव, नगराध्यक्षा विजयमाला आसनकर, माजी खासदार अनंतराव देशमुख, मुर्तीजापुर चे आमदार हरीशजी पिंपळे, अकोटचे आमदार प्रकाश भारसाकळे, माजी गृह राज्यमंत्री रणजीत पाटील,एडवोकेट नकुलदादा देशमुख, राजू पाटील राजे, गजानन देवळे आदि मान्यवर मोठ्या संख्येने मंचावर उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक ऐड नकुलदादा देशमुख यांनी केले. यावेळी माजी खासदार अनंतराव देशमुख म्हणाले की, भाजपमध्ये सामान्य जनतेला न्याय मिळवून देण्यासाठी मी भाजपमध्ये प्रवेश केला असल्याचे यावेळी अनंतराव देशमुख यांनी जाहीर केले.कार्यक्रमात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सह मंचावरील मान्यवरांचे माजी खासदार आनंतराव देशमुख व ॲडव्होकेट नुकुलदादा देशमुख यांच्या वतीने भव्य स्वागत सत्कार करण्यात आले. कार्यक्रमाचे संचालन वावर प्रदर्शन संदीप देशमुख यांनी केले यावेळी कार्यक्रमाला रिसोड शहर, तालुका व जिल्ह्याच्या अन्य भागातून मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते.


