लैब टेक्नीशियन भरती घोटाळ्याची चौकशी करण्याची मागणी नेहा परविन यांचे उपमुख्यमंत्र्यांना निवेदन सादर


रिसोड प्रतिनिधी -अल्ताफ शेख


रिसोड : वाशीम जिल्हा परिषदेच्या आरोग्य विभागाने लॅब टेक्नीशियन पदभरतीमध्ये अपात्र महिला उमेदवाराची भरती करून आपण या भरतीसाठी पात्र असूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांनी आपणास डावलले असल्याची तक्रार वाशीमच्या नेहा परविन मेहमूद खान यांनी १३ एप्रिल रोजी महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्याकडे केली आहे. 13 एप्रिल रोजी रिसोड येथील वाशिम मार्गावर संकल्प सभेला महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे आले असता नेहा परवीन यांनी मंचावर त्याची भेट घेऊन आपल्यावर झालेल्या अन्याय चे कथन करून निवेदन सादर करत यावर चौकशी करून न्याय मिळवून देण्याची मागणी केली आहे. 27 मार्च रोजी लैब टेक्नीशन या पदाचा माननीय मुख्य कार्यकारी यांच्या दालनात मुलाखतीकरिता बोलण्यात आलेल्या पाच उमेदवारांच्या कागदपत्राची फेर तपासणी करून पुन्हा मूल्यांकन करण्यात यावे अशी मागणी ही निवेदनात करण्यात आली आहे. नेहा परवीन यांनी यापूर्वीह निवेदन विविध ठिकाणी सादर करून आपल्यावर झालेल्या अन्यायाची दखल घेण्याची मागणी करण्यात आलेली आहे. मात्र नेहा परवीन यांनी थेट उपमुख्यमंत्री यांच्या मंचावर जाऊन हजारोच्या जनसमुदायासमोर सदर प्रकरणाचे निवेदन सादर केल्याने जि प तील घोटाळ्यात सहभागी असलेल्या मधे खळबळ उडालेली आहे आता या विषयात काय होते याकडे जिल्हावाशांचे लक्ष लागलेले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post