ठाण्यात जिजाऊंच्या महिलांचा 'आरंभ नव्या पर्वाचा'महिला सक्षमीकरणासाठी एक पाऊल पुढे




ठाणे प्रतिनिधी (सचिन घावट ) जिजाऊ शैक्षणिक व सामाजिक संस्थेच्या माध्यमातून 'आरंभ नव्या पर्वाचा' या कार्यक्रमाच्या माध्यमातून महिलांसाठी स्वयंरोजगार व व्यावसायिक मार्गदर्शन या कार्यक्रमाचे आयोजन ठाण्याच्या गडकरी रंगायतनमध्ये करण्यात आले. तब्बल ५००० हुन अधिक महिलांच्या उपस्थितीत मोठ्या उत्साहात हा कार्यक्रम बुधवारी संपन्न झाला.यावेळी जिल्हाधिकारी अशोक शिनगारे, प्रसिद्ध वक्ते शंभु पाटील, संदीप प्रतिष्ठानचे संदीप पाटील, ठामपा उपायुक्त वर्षा दीक्षित आदी मान्यवर उपस्थित होते.


  सर्वसामान्य कुटुंबातील स्त्रियांच्या अंगभूत कला, कौशल्यांना वाव मिळावा आणि त्यांच्या उत्कर्षासाठी त्याचा वापर व्हावा. या हेतूने जिजाऊ संस्थेच्या माध्यमातून आरंभ नव्या पर्वाचा या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते.


यावेळी अनेक गरीब, गरजू महिलांना स्वयंरोजगारासाठी मोफत शिलाई मशीन वाटप करण्यात आली. तसेच अनेक अबलांना धनादेशाचे वाटप करण्यात आले.'आरंभ नव्या पर्वाचा, ठाण्यातील महिला सक्षमीकरणाचा' या कार्यक्रमाचा निश्चितच खूप चांगला लाभ या कार्यक्रमास उपस्थित असलेल्या माता-भगिनीना होईल. याची खात्री असल्याचे यावेळी जिजाऊ संस्थेचे संस्थापक निलेश सांबरे यांनी सांगितले.

Post a Comment

Previous Post Next Post