बदलापूर -(सचिन घावट)
म्हसकर - गुप्ते हॉल , घोरपडे चौक, कात्रप , बदलापूर पूर्व येथे पुण्यश्र्लोक अहिल्याबाई होळकर यांच्या जयंतीनिमित्त महिलांसाठी विशेष शिबिराचे शासनाने विविध विभागांमार्फत महिलांच्या समस्या चे समाधान करण्यासाठी या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. या शिबिरात महिलांच्या स्थानिक समस्या सोडविण्यासाठी प्रत्येक विभागांनी प्रयत्न करावे असे या शिबिराचे उददेश होता. त्या प्रमाणे तहसील कार्यालय आणि महिला आणि बालविकास प्रकल्प अंबरनाथ यांच्या अध्यक्षतेखाली सदर शिबिराचे आयोजन करण्यात आले. या शिबिरात एकूण 20 विभागांनी सहभाग घेतला होता तसेच सदर शिबिरास मा. तहसिलदार प्रशांती माने मॅडम , मा. नायब तहसिलदार अनारे साहेब, मा. नायब तहसिलदार जाधव साहेब, मा. गट विकास अधिकारी परदेसी साहेब, मा. गट शिक्षण अधिकारी जातकर साहेब, मा. वरिष्ठ पोलीस निरीक्षक बदलापूर पूर्व अनिल पडवळ साहेब, पत्रकार श्री. थोरात साहेब ( दैनिक प्रहार ) पत्रकार श्रीम. मोहिनी मॅडम ( दैनिक सकाळ) हे उपस्थित होते.
सदर कार्यक्रमाचे उद्घाटन मा. तहसिलदार मॅडम यांनी केले. तसेच दीप प्रज्वलन करून सदर शिबिरात सहभागी असलेल्या सर्व विभागांनी आपापल्या विभागाची माहिती दिली आणि महिलांना त्यांच्या समस्यांचे समाधान होण्यास सहकार्य केले. सदर कार्यक्रमास सर्व मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले.
सदर शिबिरात एकूण २० विभाग सहभागी झाले असून या शिबिरात एकूण ९० समस्या प्राप्त झाल्या. सदर शिबिरात एकूण २५५ महिला आणि एकूण १०३ अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.
