अपघातग्रस्ताचा दावा लढणाऱ्या वकिलाने केली फसवणूक64 % दिव्यांग अपघातग्रस्त ची 7 वर्षे दिशाभूल मानवाधिकार सामाजिक न्याय आयोगाला घातले साकडे



   अंबरनाथ/प्रतिनिधी नितीन बोराडे :--7 वर्षांपूर्वी कर्नाटक राज्यातील बेंगळूर येथील सददाहल्ली जंक्शन,बि.बि. रोड,येलहंका येथे झालेल्या वाहन अपघातात दोन दिवसांनी शुद्धीवर आल्यानंतर त्रयस्थ तीन व्यक्ती आणि वकिलानी आपापसात संगणमत करून दाव्याची फी संदर्भात बोलचाली करून न्यायालयात दावा दाखल करण्यासाठी वकीलाने हॉस्पिटल मधे येऊन पत्रावर स्वाक्षरी घेतली. 2 जानेवारी 2017 पासून 7 वेळा कोर्टात झालेल्या सुनावणीनंतर 8 जुलै 2017 रोजी अंतिम निर्णय देऊन नुकसान भरपाई म्हणून 6 लाख रुपये लोक अदालत न्यायालयात मंजूर करण्यात आले. त्यापैकी 1 लाख रक्कम ही 3 वर्षे कालावधीसाठी सुरक्षा ठेव जमा करण्यात आली होती. परंतु दिनांक ०६/१०/२०१७ ला वकील श्री.वि. सोमशेखर यांनी धमकी देऊन न्यायालय परिसरात 5 लाख रुपयांचा प्रतिवादी धनादेश हिसकावून घेऊन दुसऱ्या एका कोऱ्या चेकवर सही घेऊन आधार कार्ड व पॅन कार्ड ची मूळ प्रत व झेरॉक्स प्रत घेऊन माझी दिशाभूल करून वकील महाशहाशयानी परस्पर बँक खाते खोलून फसवणूक केली. या संदर्भात मी गेल्या ७ वर्षापासून अपंग अवस्थेत आणि गरीब परिस्थितीत न्यायासाठी भटकंती करतोय. अखेर त्यासंदर्भात मानवाधिकार आणि सामाजिक न्याय आयोग (दिल्ली), मुख्यमंत्री, महाराष्ट्र उपमुख्यमंत्री, महाराष्ट्र  मुख्य न्यायाधीश-कर्नाटक, आणि मुख्य न्यायाधीश सर्वोच्च न्यायालया दिल्ली कडे विनंती अर्ज केला आहे. मला माझ्या अपघात दावा राशी प्राप्त करून न्याय हवा आहे. तसेच माझी फसवणूक करणारे वकील श्री.वि. सोमशेखर यांचे विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून अन्य कोणा व्यक्तीबरोबर असा धोका होणार नाही. यासाठी न्याय मिळेपर्यंत मी लढत राहणार असा निर्धार 64% टक्के  दिव्यांग झालेल्या काशिनाथ साबान्ना खाकी यांनी केला आहे.

               ते 64 टक्के दिव्यांग असुन त्यांना शारीरिक व मानसिक रूपाने त्रास देण्यात आला आहे.  सद्या त्यांचा उपचार पण बंद आहे. कारण  उपचार करण्यासाठी  आर्थिक परिस्थिती खूप खराब आहे. त्यांची आई मोलमजुरी करून घर चालवते. घर संसार चालवणे देखील खूप कठीण झाले आहे. म्हणून  उपचार थांबला आहे. त्यांची परिस्थिती खूप गंभीर आहे. त्यामुळे त्यांना आता दावा राशी प्राप्त करून न्याय हवा आहे. तसेच वकील श्री.वि. सोमशेखर विरुद्ध कायदेशीर कार्यवाही करण्यात यावी. जेणेकरून अन्य कोणा व्यक्तींबरोबर धोका होणार नाही. यासाठी गेल्या ६ वर्षापासून  न्याय मार्गाने लढतोय. अखेर मानवाधिकार आणि सामाजिक न्याय आयोग (दिल्ली) यांच्याकडे  न्यायासाठी तक्रार विनंती अर्ज केल्याची माहिती अंबरनाथ पश्चिमेकडील अण्णा पाटील चाळ, नवीन बालाजी नगरमध्ये चाळीत राहणारे  अपघातग्रस्त काशिनाथ साबन्ना खाकी यांनी दिली आहे.

Post a Comment

Previous Post Next Post