कारंजा प्रतिनीधी / अशोकराव
उपाध्ये : कारंजा तालूक्यातील ग्रामपंचायत पलाना यांनी पाच टक्के अपंग निधीतून विकलांग उज्वला गजानन पवार हिला तीन चाकी सायकलचे वाटप मंगळवारला सरपंच पवन गोपकर यांचे हस्ते उपसरपंच संतोष मुसळे ; ;ग्राम सचिव पी.आर. गव्हाळे ;सामातीक कार्यकर्ते मुजफ्फर भाई ;अमोल धोंडसे ;पो. पा . अनील इंगळे यांचेसह ग्राम पंचायत सदस्य व प्रतिष्ठीत व्यक्ती यांचे उपस्थितीत करण्यात आले .
वृत्त असे की ग्रामपंचायत पलाना यांनी पाच टक्के अपंग निधीतून विकलांग व्यक्तींना आवश्यक साहित्य देण्याचे ठरविल्याने मंगळवारी पलाना
ग्रामपंचायतचे सर्व माजी सरपंच ;विद्यमान ग्रा.पं. सदस्य गण ;उपसरपंच संतोष मुसळे ;ग्रामसचिव पी.आर गव्हाळे ; पो. पा . अनील इंगळे ;मुजफ्फर भाई ;अमोल घोंडसे इत्यादी मान्यवरांचे प्रमुख उपस्थितित युवा सरपंच पवन गोपकर यांचे हस्ते विकलांग उज्वला गजानन पवार हिला तीन चाकी सायकल देण्यात आली . या बाबत उज्वलाचे पालक गजानन पवार ;कारंजा पं.स. चे गट शिक्षणाधिकारी श्रीकांत माने;शिक्षणविस्तार अधिकारी सुनिल उपाध्ये ;विशेष शिक्षक सचिन घुले इत्यादीनी आनंद व्यक्त केला . कार्यक्रमाचे प्रास्ताविक मुजफ्फर भाई यांनी तर संचलन ग्रामसचीव पी.आर. गव्हाळे तर आभार प्रदर्शन ग्रा पं . कर्मचारी गजानन लांडगे यांनी केले . कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता ग्रा.पं.सदस्य यांनी प्रयत्न केले . यावेळी आंगनवाळी कर्मचारी ;आशा सेवीका ;गावातील नागरीक यांची उपस्थीती होती .
