श्री गणेश कारखान्याच्या निवडणुकीत तिरंगी लढत




अहमदनगर अफसर शेख

 

श्रीगणेश सहकारी साखर कारखान्याच्या पंचवार्षिक निवडणुकीत राज्याचे महसूलमंत्री राधाकृष्ण विखे यांचे जनसेवा मंडळ, माजी मंत्री बाळासाहेब थोरात व माजी मंत्री शंकराव कोल्हे गटाचे गणेश परिवर्तन मंडळ आणि शेतकरी संघटना अशा तीन मंडळामध्ये लढत रंगणार असल्याचे चित्र स्पष्ट झाले आहे.

 *८१५० सभासद करणार मतदान*

माजी महसूल मंत्री थोरात व कोल्हे गटाबरोबर शेतकरी संघटनेची युती जागा वाटपाच्या घोळामुळे झाली नाही. शेतकरी संघटनेने आपले आठ उमेदवारांचे स्वतंत्र पॅनल या निवडणुकीत उभे केले आहे. तर एक अपक्ष उमेदवाराच्या उमेदवारीमुळे कारखान्याच्या संचालक मंडळातील १९ जागांसाठी एकूण ४७ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. संचालक मंडळाच्या १९ जागांसाठी गणेश सहकारी साखर कारखान्याची निवडणूक १७ जून रोजी होत आहे. या निवडणुकीसाठी पाच गटातून कारखान्याचे एकूण ८१५० सभासद मतदार आपला हक्क बजावणार आहे. उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या शेवटच्या दिवशी ९२ उमेदवारांपैकी ४५ उमेदवारांनी अर्ज मागे घेतले.

Post a Comment

Previous Post Next Post