कारंजा प्रतिनिधी / अशोकराव उपाध्ये
ब्रम्हा कुमारी प्रजा पिता विश्वविद्यालयाच्या मुख्य केंद्रात अमरावती येथे प्रसीद्घ रांगोळी चित्रकार अमोल ठाकरे यांचा अमरावती झोनच्या प्रमूख सिता दिदि
यांनी ६जून रोजी शाल श्रीफळ पुष्य गुच्छ देऊन त्यांना सन्मानीत केले .
राजयोगीनी सिता दिदिच्या
अभीष्ट शुभचिंतन सोहळयात रांगोळी कार अमोल ठाकरे यांनी मुख्य द्वारावर दिदिचे हूबेहूब चित्र काढून सर्वांची प्रशंशा मिळविली . त्यांच्या कलागुणांचा सन्मान व्हावा करीता राजयोगिनी तपस्वीनी सितादिदिनी अमोल ठाकरे यांना सन्मानीत केले . याप्रसंगी ब्रम्हा परिवातील जेष्ठ प्रतिष्ठीत हरीष भाई ;ब्रम्हा कुमार प्रमोद भाई बोळखे ;राजेशभाई ;प्रविण भाई ;डॉ स्वप्नील भाई ;बारड साहेब ;लकी भैया परीवार ;प्रा . गुल्हाने ;रमेशभाई खराळे ;विजय जैस्वाल ;योगीतादिदि;तेजलदिदिसह
जिल्ह्यातील सर्व सेंटर्सच्या प्रमुख दिदि यांचे सह ब्रम्हा परिवार मोठया प्रमाणात उपस्थीत होता .

