कारंजा प्रती नीधी / अशोकराव उपाध्ये
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या राज्याभिषेकाच्या ३५० व्या वर्षानिमित्त सांस्कृतीक कार्य विभागाच्या माध्यमातून राज्यात वर्षभर विवीध कार्यक्रम राबविण्यात येत आहे . त्याचाच एक भाग म्हणून छत्रपती शिवाजी महाराज यांच्या कर्तुत्वाला मानवंदना देण्यासाठी काजळेश्वर ग्रामपंचायत भवन येथे ६जून रोजी शिवराज्याभिषेक दिन शिवरायांचा भगवा ध्वज फडकऊन साजरा करण्यात आला .
याप्रसंगी ग्रामपंचायत सरपंच नितीन पा .उपाध्ये यांचे प्रमूख उपस्थीतीत पं.स. सदस्य फौजी रंगराव धुर्वे यांनी प्रथम छत्रपती शिवरायाचे प्रतिमेचे पूजन केले तसेचउपस्थीत सरपंच नितीन पा उपाध्ये ;सत्संगी मुकेश बावाजी उपाध्ये ;सोसायटी सदस्य गजानन भड;पोस्ट मास्टर दिपक चौधरी ;शिवभक्त सुधाकरराव वानखडे सह उपस्थीतांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेचे व शिवध्वज स्तंभाचे पुजन केले .पंस. सदस्य माजी सैनीक फौजी रंगराव धुर्वे यांचे हस्ते ध्वजारोहन करण्यात आले . उपसरपंच तैसीमभाई यांनी शिवराज्याभिषेक प्रतीमा ग्राम पंचायतला समर्पित केली . याप्रसंगी शिवप्रेमी मावळ्यांची उपस्थीती होती . कार्यक्रमाचे प्रास्ताविक सरपंच नितीन पा उपाध्ये यांनी तर सूत्रसंचलन हरीदास चौधरी तर आभार प्रदर्शन सुधीर उपाध्ये यांनी केले .
