अकोला येथील जनसंपर्क अभियानाला उपस्थित रहा- माजी आ. विजयराव जाधव

 



मालेगाव-प्रतिनिधी उमेश लहाने


प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या सरकारला ९ वर्ष पूर्ण झाल्याने केंद्र सरकारने केलेली जनतेच्या उपयोगी कामाची व योजनांची माहिती जनतेसमोर आणण्यासाठी भाजपातर्फे मोदी ९ जनसंपर्क अभियान कार्यक्रम आयोजित करण्यात आला असताना या कार्यक्रमांतर्गत येत्या १४ जून रोजी अकोला येथे समेचे आयोजन करण्यात आले आहे तरी या सभेला रिसोड विधानसभा मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने जनतेने उपस्थित राहावे असे आवाहन भाजपाचे माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी केले आहे.


अकोला येथे १४ जून रोजी होणाऱ्या या मोदी ९ जनसंपर्क अभियान अंतर्गत आयोजित समेला भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे पी नड्डा तसेच राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची प्रमुख उपस्थिती तसेच मार्गदर्शन लाभणार आहे 

उपस्थित होणाऱ्या या अकोला येथील सभेची जयंत तयारी सुरू झाली असून या तयारीसाठी मालेगाव रिसोड तालुक्यात भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते ही जोमाने कामाला लागले आहे २०१४ पासून देशात नरेंद्र मोदी यांचे सरकार सत्तेत असून या नववर्षाच्या कार्यकाळात प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वात मार्गदर्शनात व सरकारने जनतेच्या हितासाठी अनेक महत्त्वपूर्ण कामे केली आहे त्याचबरोबर गोरगरीब व सर्वसामान्य नागरिकांसाठी शेतकऱ्यांसाठी विविध उपयोगी योजना या अमलात आणले आहे त्यामुळे मोदी सरकारने केलेली या कामे ही गोरगरीब जनतेपर्यंत पोहोचविली पाहिजे व त्या कामांना उजाळा देण्यासाठी देशमरात मोदी ९ जनसंपर्क

अभियान कार्यक्रम राबविण्यात जेपी नड्डा येत आहे व यासाठी अकोला येथे यांच्या सभेचे आयोजन करण्यात आले असून या सभेमध्ये मोदी सरकारने मागील नऊ वर्षाच्या काळात राबविलेल्या योजनांची व पुढे राबविण्यात येणाऱ्या योजनांची माहिती समेतून जनतेसमोर आणणार आहेत.

त्यामुळे अकोला येथे १४ जून रोजी आयोजित या सभेला मतदार संघातील दोन्ही तालुक्यातील कार्यकर्त्यांसह नागरिकांनी हजाराच्या संख्येने सभेला उपस्थित राहण्याचे आवाहन भाजपाचे माजी आमदार अॅड. विजयराव जाधव यांनी केले आहे. तर यावेळी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलताना त्यांनी सदर अभियानाची व सभेची जास्तीत जास्त माहिती जनतेपर्यंत पोहोचविण्याची काम भाजपा कार्यकर्ते करीत असल्याने सभेला मतदारसंघातून हजारोंच्या संख्येने उपस्थिती लाभणार असल्याचेही त्यांनी आवाहन केले आहे.

Post a Comment

Previous Post Next Post