प्रतिनिधी अल्ताफ पठाण
मेडशी : हिंदू धर्मातील वटपौर्णिमा या सणाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ज्येष्ठ महिन्यात येणाऱ्या पौर्णिमेला वटपौर्णिमा म्हणून साजरी केले जाते.
आपल्या पतीला उत्तम निरोगी दीर्घायुष्य लाभावे, यासाठी मनोभावे वडाच्या झाडाची पूजा करतात. वडाच्या झाडाला सफेद धागा गुंडाळून पाच प्रदक्षिणा घालतात. आजचा हा दिवस सर्व माता-भगिनींना उत्साहाचा दिवस असतो.
या वटपौर्णिमेच्या निमित्त सर्व माता-भगिनींना गावातील पाराच्या वडाच्या झाडाची पूजा करून सात प्रदक्षिणा मारून धागा गुंडाळून पुढच्या सात जन्मात हाच पतिदेव मिळू दे म्हणुन देवाला साकडे घालतात.
हिंदू पंचांगातील ज्येष्ठ महिन्यात येणारी पौर्णिमा हा दिवस "वटपौर्णिमा" म्हणून साजरा केला जातो. ह्या दिवशी स्त्रिया वटपौर्णिमा नावाचे व्रत करतात. या व्रतादरम्यान विवाहित स्त्रिया आपल्या पतीला उत्तम आरोग्य लाभावे, दीर्घायुष्य प्राप्त व्हावे म्हणून वडाच्या झाडाची पूजा करतात.वडाच्या झाडाचे आयुष्य अधिक असते.वडाचं झाड हे प्रतिकात्मक असून याचे मूळ खोलवर पसरलेले असते. वडाच्या मुळांचं नातं जसं मातीशी घट्ट राहातं तसंच आरोग्याशी घट्ट नातं राहावं आणि आरोग्य वडाप्रमाणेच चांगलं राहावं यासाठी वडाच्या झाडाची पूजा केली जाते. मेडशी गावातील महिलांनी या वर्षी अतीशय उत्साहात आनंदाने वटपौर्णिमा हा सण साजरा केला.
