प्रतिनिधी जयेश अहिरे
आज दिनांक ०३/०६/२३ रोजी वटपौर्णि व जयेशभाऊ यांच्या आई यांच्या वाढदिवसा निमित्त माता सावित्रीबाई फुले यांचे पूजन करून राष्ट्रीय मातृछाया जनसेवा फाउंडेशन चे संस्थापक अध्यक्ष जयेशभाऊ अहिरे यांच्या मार्गदर्शनानुसार व मार्गदर्शनाखाली नंदुरबार जिल्हा महिला अध्यक्ष सौ .ज्योती अहिरे यांनी शहादा तालुक्यातील विधवा महिलांना साड्या
वाटप करून व हळदीकुंकू चा कार्यक्रम घेऊन वटसावित्री सण साजरा करण्यात आला. जयेशभाऊ अहिरे यांनी सर्व महिलांना फोन करून वटपौर्णिमेच्या शुभेच्छा दिल्या व त्यांच्या ग्रामीण भागातील व्यथा एकूण त्यांना मदत करण्याचे आश्वासन दिले. यावेळी नंदुरबार जिल्हा अध्यक्ष. ज्योती अहिरे यांनी आपले मनोगत व्यक्त करत असताना सांगितले की ज्याप्रमाणे जयेशभाऊ हे सामान्यांच्या कार्यासाठी धावून जातात. त्याचप्रमाणे आम्हीही भाऊंच्या मार्गदर्शनाखाली शासनाच्या विविध योजना विधवा महिला, असंघटित महिला , शिक्षित महिला, यांच्यासाठी निस्वार्थ सेवा करत राहू .असे कार्यक्रमाचे वेळी ज्योती अहिरे यांनी कार्यक्रमाचे वेळी आपले मनोगत व्यक्त केले. यावेळी नंदुरबार जिल्ह्या चे समस्त पदाधिकारी व महिला भगिनी उपस्थित होते

