ब्रम्हाकुमारीज इश्वरीय सेवेत राजयोगीनी तपस्वी सितादिदिचे कार्य प्रशंसनीय . समर्पित राजेश भैया यांचे प्रतिपादन

 


कारंजा   प्रतीनीधी / अशोकराव उपाध्ये .

अमरावती विभागात ब्रम्हा कुमारीज प्रजापीता विश्वविद्यालयाचे माध्यमातून इश्वरीय सेवेचे वर्षानुवर्षापासून सुरु असलेले भारताला विश्वगुरू बनविण्याचे महान कार्य अमरावती झोनच्या प्रमूख राजयोगीनी तपस्वी सिता दिदि करीत आहे . त्यांचे इश्वरीय कार्य प्रशंसनीय ; अतुलनीय असल्याचे मत समर्पित कुमार राजेश भैया यांनी ६जून रोजी त्यांच्या अभीष्ट शुभचिंतन सोहळ्यात अमरावती येथे व्यक्त केले .


          तपस्वी राजयोगीनी सितादिदीचे प्रेम आई सारखे सर्व ब्रम्हा परीवारावर आहे . संकल्प से सिद्धी हे ब्रीद घेऊन सकारात्मक सोच व सर्वाचे भले व्हावे ही ईच्छा मनात ठेऊन शांततेतच शक्ती वास करते हा मार्ग सांगत राजयोगातच सर्वसमास्याचे निराकरण होते ही अनुभूती प्रजापीता विश्वविद्यालयातून सितादिदी देत आहे .  या माध्यमातून देश विश्व गुरु होऊ शकतो यासाठी ब्रम्हाकुमारीज माता भगीनीचे कार्य राजयोगीनी सितादीदीचे पुढाकारात यशस्वीरित्या होत आहेत . याप्रसंगी प्रमोद भैया ;डॉ. स्वप्नील भैया ;प्रवीण भैया ;बारड साहेब ;लकी भैया तथा अनेक महानुभाव यांनी सिता दिदिच्या अभीष्ट शुभचिंतन सोहळ्यास उपस्थीती दिली . अमरावती झोनच्या सर्व तालुकास्तरीय सेंटरर्सच्या प्रमुख दिदि तथा ब्रम्हा परीवार यांनी कार्यक्रमाला उपस्थीती देत सितादिदिचे अभीष्ट शुभचिंतन केले . अतीशय शांत व रमणीय मोहक वातावरणात दिदीचा अभीष्ट शुभचिंतन सोहळा उपस्थीतांना भेटवस्तू व नास्ता देत संपन्न झाला . कार्यक्रमाचे संचलन व आभार प्रदर्शन प्रमोद भैया यांनी केले .

Post a Comment

Previous Post Next Post