कारंजा येथे शिवराज्याभिषेक सोहळा उत्साहात

 


कारंजा-महादेव तायडे 

स्थानिक मराठा सेवा संघ,जिजाऊ बिग्रेड व सामाजिक समता प्रबोधन मंच यांच्या संयुक्त विद्यमाने छत्रपती शिवाजी महाराज यांचा 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा शिवाजी महाराज चौक येथिल शिवाजी महाराज यांच्या पूर्णाकृती पुतळ्याजवळ उत्साहात साजरा करण्यात आला. 


कार्यक्रमाच्या सुरुवातीला छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्यांचा व शिवराज्याभिषेक सोहळ्याच्या प्रतिमेचे पूजन व हरपर्ण करून करण्यात आली. कारंजा नगर परिषद चे माजी नगराध्यक्ष  दत्तराज डहाके व संजय काकडे यांनी शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात केली. उपस्थित विविध सामाजिक संघटनेचे पदाधिकारी व कार्यकर्ते यांनी शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून शिवाजी महाराज की जय,शिवराज्याभिषेक सोहळा चिरायू होवो,अशा घोषणा देण्यात आल्या. 

सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गोपाल खाडे यांनी तर आभार विजय भड यांनी मानले. 

सदर कार्यक्रमाला मराठा सेवा संघाचे राजेन्द्र मोडक,प्रवीण कानकिरड,डॉ.रवि ठाकरे, अनिल मोरे,अनिल लुंगे, बंडूभाऊ पिंपळशेंडे,प्रा.राजेन्द्र इंगोले,गजनन बाजारे,अशोक वानखडे निता खाडे,वर्षा भगत,वीणा धाये,आरती अघम,छाया गावंडे,मंजूषा पिम्पलशेंडे,तसेच सामाजिक समता प्रबोधन मंचचे हंसराज शेंडे,गजनन अमदाबादकर,

 विनायक पद्माकर व इतर पदाधिकारी आणि अमोल अघम,डॉ. राम गुंजाटे,विजय गागरे, तायडे, घोडसाळ, ,रवी सटोटे, दीपक काळे,चांदुभाऊ खिराळे, ज्ञानेश्वर बारबोले याचे सह अनेक कारंजेकर  मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post