मालेगाव -उमेश लहाने
मालेगाव तालुक्यातील तीवळी शेत शिवारातील गट नं ३२३ सोपान भास्कर शिंदे या शेतकऱ्याच्या शेतातील पूर्णतः वादळी वाऱ्यामुळे खचुन गेल्याने शेतकऱ्याचे तीन लाखाचे नुकसान झाले आहे.
४ जून रोजी जिल्ह्यात ठिकठिकाणी वादळीवाऱ्यासह पाऊस पडला.
असाच वादळी स्वरूपाचा पाऊस शिरपूर पासून नजिक असलेल्या तिवळी शेत शिवारात सुद्धा पडला. या वादळी पावसाने गट नंबर ३२३ मधील सोपान भास्कर शिंदे यांच्या शेतातील ५० बाय ५० फुट सिमेंट विटा ची बांधलेली विहीर पूर्णता खचली आहे. वादळी पाऊसामुळे ३५ फुट विहिर खचल्याने तीन लाखाचे नुकसान झाले आहे. शासनाने नुकसानग्रस्त शेतकऱ्याला नुकसान भरपाई द्यावी अशी मागणी शेतकऱ्यांकडून करण्यात आली आहे. नुकसान ग्रस्त विहिरीची पाहणी तलाठी एन आर भुतकर यांनी केली असून पंचनाम्यामध्ये तीन लाखाचे शेतकऱ्याचे नुकसान झाल्याचे नमूद केले आहे.
सौर पंम्पाचेही अतोनात नुसकान.झाले
तिवळी येथील शेतशिवार परिसरातील बळीराम शंकर लहाने,मालता भानुदान लहाने,शिवाजी तुळसीराम लहाने,शुभांगी निलेश लहाने,गीता भास्कर शिंदे,यांच्या स्वमालकीच्या विहीरीवरील,मुख्यमंत्री सौर योजनेतील शासकीय योजनेमधील सौर पंम्प बसविण्यात आलेले आहेत. अचानक झालेल्या वादळी वा-यामुळे सौर पंम्पाचेही अतिशय नुसकान झालेले आहे....सदर कंपनीने लवकरात लवकर सर्वे करुन संबंधित शेतकऱ्यांचे सौरपंम्प दुरुस्ती करुन देण्यात यावे अशी आग्रही मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.
