अफसर शेख
शिंदे-फडणवीस सरकारने राज्यात ४० हजार कोटींच्या नव्या प्रकल्पांना मान्यता दिल्यामुळे राज्यात सव्वा लाख रोजगाराच्या संधी निर्माण होणार आहेत. त्यात नगरमध्ये ११० काेटींचा गणराज इस्पात प्रकल्प सुरू हाेणार आहे, अशी माहिती खासदार डाॅ. सुजय विखे पाटील यांनी दिली.
*खासदार विखे म्हणाले*
''रायगड येथे परफॉर्मन्स केमिसर्व कंपनीचा २७०० कोटींचा प्रकल्प, नंदूरबार येथे जनरल पॉलिफिल्म्सचा ५०० कोटींचा प्रकल्प, सातारा येथे विप्रो परी रोबोटिक्सचा ५४४ कोटींचा प्रकल्प, तर नगरमध्ये ११० कोटींचा गणराज इस्पात प्रकल्प सुरू होणार आहे. महाविकास आघाडीच्या नावाने सत्ता हडप करून राज्याच्या सर्व क्षेत्रातील विकासाला खीळ घालण्याच्या ठाकरे सरकारच्या धोरणांमुळे महाराष्ट्राची देशाच्या उद्योगक्षेत्रात पिछेहाट झाली. खंडणीखोरी, दमदाटी, प्रकल्पांना मान्यता देण्यापासून सुविधा देण्यापर्यंतच्या धोरणातील उदासीनता अशा अनेक कारणांमुळे ठाकरे सरकारने कागदावर केलेले करार प्रत्यक्षात आलेच नाहीत.''
