संतोष च-हाटे
जिल्हा प्रतिनिधी
गोरगरिबांच्या सेवेसाठी सदैव तत्पर असणारे बाजड क्लीनिक व वारकरी मेडिकल यांच्या संयुक्त विद्यमाने शहरातील ब्रह्माकुमारीज सेवा केंद्रातील ज्ञानार्थी महिलांचे आरोग्य तपासणी करून त्यांना औषधीचे वाटप सुद्धा करण्यात आले.संचालिका ब्रह्माकुमारी ज्योती दीदी यांच्या निर्देशानुसार घेण्यात आलेल्या आरोग्य शिबिराला डॉ सागर संजय बाजड,डॉ. सौ शीतल सागर बाजड,वारकरी मेडिकलचे रुपेश संजय बाजड व सौ वैष्णवी रुपेश बाजडयांनी आरोग्य तपासणी करून औषधी वितरण करण्यासाठी बहुमूल्य वेळ दिला. ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने ज्ञानार्थी अपर्णा बहन व ब्रह्माकुमारीज मीडिया विंग सदस्य रवि अंभोरे यांनी डॉ. बाजड सह सर्वं
आरोग्य तपासणी चमूचे स्वागत केले.सर्वं उपस्थितीत ज्ञानार्थी महिलांनी आरोग्य तपासणी करून मिळालेल्या मार्गदर्शनाबद्दल व औषधोपचाराबद्दल समाधान व्यक्त केले. ब्रह्माकुमारीज परिवाराच्या वतीने सर्वं बाजड परिवाराचे आभार व्यक्त करण्यात आले. प्रसंगी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन प्राध्यापक रवी अंभोरे यांनी केले तर आभार प्रदर्शन रुपेश बाजड यांनी मानले.. यावेळी मयूर शिंदे राहुल बाजड व वारकरी मेडिकलचा संपूर्ण स्टाफ हजर होता
