वीज पडून मृत पावलेल्या शेतकऱ्याच्या परिवाराला चार लाखाची मदत आमदार झनक तहसीलदार तेजनकर यांच्या हस्ते दिला धनादेश




रिसोड : भर जहागीर परीसरामध्ये दी. 4 जून रोजी दुपारी एक ते दोन च्या दरम्यान सुसाट्याच्या वा-यासह विजांच्या कडकडाटासह ,विज पडुन संदीप दत्ता काळदाते वय 35 या युवकावर विज पडतल्याने त्याचा मृत्यू झाला होता. वृत्त संदीप काळदाते याच्या परिवाराला नैसर्गिक आपत्ती व्यवस्थापन अर्थसहाय निधीमधून चार लाख रुपयाची मदत करण्यात आली.  रिसोड मालेगाव विधानसभेचे आमदार अमित झनक व तहसीलदार प्रतीक्षा तेजनकर यांच्या हस्ते सदर धनादेश संदीप काळदाते यांच्या परिवाराला सुपूर्द करण्यात आला.यावेळी  रवींद्र चोपडे बबनराव गारडे सचिन इप्पर आदी उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post