वाहतूक कोंडीने रिसोड करांचा श्वास गुदमरतोय



रुपेश बाजड


रिसोड ता 19

रिसोड शहरातील रस्त्याचे काम सुरू आहे एकतर्फी रस्ता पूर्ण झाला मात्र त्या रस्त्याचा वापर नागरिक पार्किंग म्हणून करताना दिसत आहे एकतर्फी रस्ता संपला की रस्त्याच्या मधोमध दुभाजकाचे खड्डे असल्यामुळे रस्ता होऊन देखील मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तर रस्त्याचे काम पूर्ण होईपर्यंत किंवा दुभाजक जोपर्यंत होत नाही तोपर्यंत  दुभाजकाचे खड्डे बुजवण्यात यावे अशी मागणी शहरातील नागरिक करीत आहेत.


वाशिम जिल्ह्याची राजकीय राजधानी म्हटलं की आपसूकच रिसोड चे नाव येतं मात्र रिसोड आता वेगळ्या वळणावर चाललं की काय असा प्रश्न सामान्य नागरिकांना पडला आहे रिसोड येथे मोठे मोठे दिग्गज राहतात त्या दिग्गजांचा फायदा सामान्य नागरिकांना व्हावा एवढी माफक अपेक्षा असते मात्र असं होताना दिसत नाही लोकप्रतिनिधी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करतात की काय असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला आहे अत्यंत वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता म्हणजे बस स्टँड रोड म्हणून त्या रस्त्याची ओळख आहे या रस्त्याचे काम मोठ्या कासव गतीने सुरू असून रस्त्याचे काम कासवगतीने सुरू असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे रस्त्याचे काम पूर्ण जरी झाले तरी एकतर्फी रस्त्यावर जणू काही हा रस्ता पार्किंगसाठी केलेला आहे असा वापर सध्या नागरिक करताना दिसत आहेत एकतर्फी रस्त्यावर वाहनांच्या लांबच लांब रांगा दिसत असतात म्हणजे त्या ठिकाणी वाहनांची पार्किंग असते रस्त्याच्या बाजूला दुभाजकासाठी खड्डे असल्यामुळे त्या ठिकाणी वाहन जाऊ शकत नाही केवळ एकतर्फी रस्त्यावरून वाहनांची येजा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे याकडे प्रशासनाने लक्ष देऊन रिसोड करांचा होणारा त्रास दूर करावा अशी मागणी शहरवासीयांनी केली आहे. या गंभीर बाबीकडे कोणीच लक्ष देत नसल्याने वाहनधारकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे शहरातील सिव्हिल लाईन रस्त्याचे काम गेल्या अनेक वर्षानंतर रस्त्यावर मरणयातना भोगल्यानंतर रस्ता पूर्ण झाला अजूनही काही ठिकाणी रस्त्याचे काम अपूर्ण आहे बस स्टॅन्ड लोणी फाटा मालेगाव नाका वाशीम नाका हा रस्ता अतिशय वर्दळीचा आणि महत्त्वाचा रस्ता आहे या रस्त्याचे काम जवळपास पूर्ण होत आले आहे संपूर्ण वाहनाची वर्दळ एकाच वाजून बाजूने सुरू असल्याकारणाने या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे रस्त्याचे काम पूर्ण झाले मात्र शहरातील लोणी फाटा परिसरामध्ये एकतर्फी रस्ता चा वापर हा पार्किंग साठी करण्यात येत आहे तरी हा रस्ता मोकळा करून रिसोडकरांना होणारा त्रास थांबावावा अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे याच रस्त्यावर पेट्रोल पंप एसटी बसेस पेट्रोल भरण्यासाठी अकोला लोणार जाण्यासाठी यात रस्त्यावरून बसेसला जावे लागते त्यामुळे बसेस ला सुद्धा मोठ्या प्रमाणात पोहोचायला वेळ होत असून प्रवाशांचे देखील हाल होत आहेत त्यामुळे रस्त्याच्या कामाची गती वाढवून रस्त्याचे काम पूर्ण करावे अशी मागणी शहरातील नागरिकांनी केली आहे रस्ता अजूनही अपूर्ण असून तब्बल पाच वर्षे या रस्त्याचे भिजत घोंगडे कायम होते राजकीय श्रेय वादाच्या लढाईत रस्त्या अभावी नागरिक बेजार झाले होते अनेक वेळा रस्त्याचे काम सुरू झाले अनेक वेळा बंदही झाले, आता जवळपास रस्त्याचे काम पूर्ण होत आले असून दुभाजकासाठी जे खड्डे खोदून ठेवलेले आहेत ते त्वरित बुजवण्यात यावे व ज्या ठिकाणी पार्किंगला लावण्यात येणारे वाहण्यामुळे त्रास होत आहे तो रस्ता मोकळा करण्यात यावा पोलीस प्रशासनाने यात लक्ष घालावे व सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्ता पूर्ण करून घ्यावा अशी मागणी शहरातील नागरिक सध्या जोर धरून आहेत....



शहरातील वाशिम नाका ते मालेगाव नाका या रस्त्याचे काम सुरू आहे जवळपास रस्त्याचे काम पूर्ण झाले आहे एकतर्फी रस्त्याचा वापर हा पार्किंग साठी होत आहे. मदत दुभाजकासाठी खोदून ठेवल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहनधारकांना आपला जीव मोठे धरून प्रवास करावा लागत आहे रस्त्याची रुंदी कमी असल्याकारणाने त्या ठिकाणी दुभाजक न करता खोदून ठेवलेला रस्ता त्वरित बुजवून रस्ता मोकळा करण्यात यावा जेणेकरून मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होणार नाही.

संजय चैताने

सेवानिवृत्त उपमहाप्रबंधक बीएसएनएल


वाशिम नाका ते मालेगाव नाका या एका किलोमीटर रस्त्यावर प्रवास करताना आपला जीव मोठे धरून प्रवास करावा लागत आहे लोणी फाटा परिसरामध्ये दुभाजकासाठी खोदून ठेवलेला रस्त्यामुळे एकतर्फी रस्ता हा केवळ पार्किंगसाठी याचा वापर होताना दिसत असून एकतर्फी रस्त्यावरून वाहनांची याचा होत असल्यामुळे मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होत आहे तरी याकडे प्रशासनाने लक्ष देऊन तातडीने रिसोडकरांचा श्वास मोकळा करावा

रवींद्र मोरे पाटील

संचालक खरेदी विक्री संस्था रिसोड

Post a Comment

Previous Post Next Post