अहमदनगर अफसर शेख
प्रतिनिधी: कर्जत तालुक्यातील शेतकऱ्यांना अगोदरच ओला दुष्काळाचा निधी अद्यापही शासनाने दिला नसून त्यातच शेतकऱ्याच्या शेतमालाला भाव दिला नसून शेतकऱ्याचे अतोनात नुकसान झालेले आहे त्यातच शेतकऱ्यांना आता पाळी पेरणी करण्यासाठी कर्ज काढावे लागत आहे त्यामुळे शेतकरी कर्जबाजारी होत असून मानसिक तणावाखाली येत आहे अशातच शेतकऱ्यांना पाणी पेरणी करण्यासाठी शासनाने एकरी दहा हजार रुपये अनुदान त्वरित शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करावे अशी मागणी महाराष्ट्र नवनिर्माण सेना कर्जत तालुक्याच्या वतीने आज तहसीलदार साहेब यांना निवेदन देऊन करण्यात आली याप्रसंगी तालुका अध्यक्ष- सचिन सटाले, जिल्हा उपाध्यक्ष निखिल जगधने, तालुका उपाध्यक्ष आबासाहेब उघडे, सरचिटणीस विशाल भुसारे, उपाध्यक्ष विनोद थोरात, धरम सिंग परदेसी,शहराध्यक्ष सागर पाटील, शहर उपाध्यक्ष दिनेश कोकाटे, शाखाध्यक्ष अनिकेत भवाळ, अथर्व तरटे, समीर येळपणेकर, राजेंद्र गायकवाड आधी मनसैनिक उपस्थित होते. तरी शेतकऱ्यांना त्वरित आर्थिक मदत करण्यात यावी अन्यथा मनसे आंदोलन करण्यात येईल असे निवेदनात म्हटले आहे.
