आळंदी येथील अमानुष लाठी चार्ज मध्ये जखमी झालेले ह भ प भागा महाराज घोलप यांची पारनेरचे आमदार निलेश लंके यांनी घेतले रुग्णालयात जाऊन भेट



  प्रतिनिधी अर्जुन शेळके

नांदूर पठार येथील वारकरी ह.भ.प भागा महाराज घोलप (विणेकरी) हे गेल्या ५४ वर्षा पासून अखंड पणे आळंदी ते पंढरपूर अशी माऊलीच्या पालखी सोहळ्या बरोबर पायी वारी करत आहे.

रविवारी आळंदी ह्या ठिकाणी  आळंदी ते पंढरपूर पायी दिंडी सोहळ्या करिता आळंदी ह्या ठिकाणी ह.भ.प भागा महाराज घोलप होते ,आणि त्या ठिकाणी उडालेल्या गोंधळात त्यांना पोलिसांकडून प्रचंड मारहाण झाली आहे ,अक्षरशः त्यांच्या डोक्याला मार लागलेला आहे आज ही ते चांगल्या मनःस्थितीत नसून फक्त मला मारू नका ,मला मारू नका अशा घाबरलेल्या अवस्थेत आहे.

आता सध्या ते सिव्हिल हॉस्पिटल अहमदनगर या ठिकाणी असून त्याना अमानुष मारहाण झाल्याने ते घाबरलेल्या मनस्थितीत आहेत.



 आळंदी येथे वारकऱ्यांवर पोलिसांनी लाठीचार्ज केला ही घटना ऐकण्यासाठी सुद्धा अत्यंत क्लेशदायक वाटते. लाठी चार्ज करायला समोर कोणी चोर,दरोडेखोर अतिरेकी होते का ? कोणी शातीर गुंड होते ज्यांना आवरण्यासाठी पोलिसांना लगबगीने  लाठी चार्ज करावा लागला!


याच्यामध्ये मंदिर प्रशासन समितीचा तेवढाच मोठा हातभार आहे. वारकरी त्याच्या घरून  आळंदीला ऊन, वारा, पाऊस याची पर्वा न  करता चालत येतो कारण त्याला माऊलीच्या समाधीचे दर्शन हवे असते. 


पंढरपुरात दरवर्षी वारीच्या निमित्ताने वीस ते पंचवीस लाख लोक एकत्र जमलेले असतात परंतु तिथे अशी कुठली घटना घडल्याचे ऐकिवात नाही. पुणे पोलीस प्रशासनाने त्यांना हे कृत्य का करावे लागले याचे किमान महाराष्ट्रातील जनतेला स्पष्टीकरण द्यावे.

वारी चालते ती वारकऱ्यांच्या निष्ठेने भक्तीने आणि प्रेमाने. प्रशासनाने वारीमध्ये कायदा आणि सुव्यवस्थेची भूमिका बजावताना त्यांच्याकडून वारकऱ्यांवरच  वार होऊ नयेत! 


झालेल्या घटनेचा पारनेर मतदार संघाचे आमदार निलेश लंके यानी जोरदार जाहीर निषेध व्यक्त केला.!!!

Post a Comment

Previous Post Next Post