रस्त्यावरील स्टेशनवरील मुलांना शिक्षणाच्या प्रवाहात आणण्यासाठी सर्वात जास्त प्रयत्न ठाणे जिल्ह्यात आमदार संजयजी केळकर यांनी केले जिल्हाधिकारी -शिनगारे साहेब




ठाणे  (सचिन घावट )   ठाणे जिल्ह्यातील रस्त्यांवरील उपेक्षित मुलांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी सुरू करण्यात आलेल्या फिरते पथक शाळेतील 145 मुला-मुलींना महापालिका व खासगी अनुदानित शाळांमध्ये प्रवेश मिळाला आहे. या मुलांना शाळेचे साहित्य, गणवेश वितरणाचा कार्यक्रम आज आमदार निरंजन डावखरे व जिल्हाधिकारी अशोक शिनगारे यांच्या उपस्थितीत पार पडला. रस्त्यावर राहणाऱ्या या मुलांना शिक्षणाच्या, समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्याचे हे पाऊल स्तुत्य असून यासंदर्भात धोरण करण्यासाठी अधिवेशनात पाठपुरावा करण्यात येईल, असे आमदार श्री. डावखरे यांनी यावेळी सांगितले. 


महिला व बालविकास विभाग, एकात्मिक बाल संरक्षण योजनेअंतर्गत ठाणे जिल्ह्यात सुरू करण्यात आलेल्या फिरते पथक शाळेतील मुलांसाठी या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हाधिकारी कार्यालयाच्या नियोजन भवनमध्ये झालेल्या या आगळावेगळ्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे म्हणून आमदार श्री. डावखरे व जिल्हाधिकारी श्री. शिनगारे उपस्थित होते. यावेळी जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सुर्यवंशी, ठाणे महानगरपालिकेच्या उपायुक्त वर्षा दीक्षित, पोलीस निरीक्षक मनिष पाटील, जिल्हा महिला व बालविकास अधिकारी महेंद्र गायकवाड, बाल कल्याण समितीच्या अध्यक्षा राणी बैसाणे, भरत पोखरकर, स्वाती रणधिर, स्वयंसेवी संस्थाचे स्वाती सिंग, विजय जाधव, रमेश थोरात, श्री.खान आदी उपस्थित होते.  यावेळी प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते मुलांना गणवेश, शालेय साहित्याचे प्रातिनिधीक स्वरुपात वाटप करण्यात आले.

Post a Comment

Previous Post Next Post