शेख अन्सार प्रतिनिधी
रिसोड : गेल्या काही महिन्यांपासून रिसोड शहर व ग्रामीण भागातील काही आधार केंद्र बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांना मोठा त्रास सहन करावा लागत आहे. केंद्र सरकारने जुने आधार कार्ड अपडेट करण्याची घोषणा केल्यापासून प्रत्येकाला आपले आधार अपडेट करावे लागत आहेत.परंतु रिसोड शहर व तालुक्यातील काही ग्रामीण भागातील आधार केंद्र बंद असल्याने नागरिकांना विविध समस्यांना सामोरे जावे लागत आहे. शासकीय स्तरावर चालणारं पंचायत समितीमध्ये एक आधार केंद्रे आहेत. तर अन्य आधार केंद्र विविध कारणांमुळे बंद आहे.गेल्या अनेक महिन्यांपासून बंद असलेल्या आधार केंद्रांपैकी पंचायत समितीमध्ये सुरू असलेल्या एकमेव आधार केंद्रावर मोठी गर्दी होत आहे.तासन तास प्रतीक्षा करूनही नागरिकांना रिकाम्या हाताने जावे लागत आहे.यामुळे त्यांचा वेळ व पैसा वाया जात आहे. याशिवाय आधार अपडेट करण्यासाठी कागदपत्रे जोडताना नागरिकांना अनेक अडचणींना सामोरे जावे लागत आहे.आधार कार्ड अपडेट करण्यासाठी लागणाऱ्या कागदपत्रांमध्ये काही कागदपत्रे अशी आहेत जी मिळणे अत्यंत अवघड आहे.त्यामुळे वृद्ध नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागत आहे.काही आधारमध्ये जन्मतारीख नाही, काही आधारमध्ये चुकीची जन्मतारीख आहे, तर काही ठिकाणी नावांमध्ये चुका आहेत.अशा लोकांकडून जन्मदाखला मागितल्या जात आहे. ज्यांचा जन्म 60 ते 90 च्या दशकात झाला आहे. अश्या नागरिकांनी जन्म दाखले कुठून आनावे ? असा प्रश्न त्यांच्यासमोर निर्माण होत आहे.अशा परिस्थितीत शासनाच्या आदेशानुसार त्यांना न्यायालयामार्फत जन्मदाखला आणण्यास सांगितले जात आहे.जे खूप अवघड आहे यात अशा नागरिकांची दम छाक होत आहे.आणि अशा परिस्थितीत , अनेकांचे बँकांमध्ये पैसेही अडकले आहेत. तर काही नागरिक विविध योजना पासून वंचित आहे तर कोणाचे पेन्शनचाही प्रश्न उभा राहिलेला आहे. ज्या नागरिकांकडे जन्माचा पुरावा म्हणून शाळा सोडल्याचा दाखला व इतर काही कागदपत्रे आहेत मात्र ते पुरेसे नसल्याचे सांगण्यात येत आहे.
अशा परिस्थितीत शासनाने त्यांच्याकडे असलेल्या कागदपत्रांना मान्यता देऊन हे अडथळे दूर करावेत.श अशी मागणी सामान्य नागरिकांकडून केली जात आहे .त्यामुळे या सर्व विषयांकडे लक्ष देण्याबरोबरच बंद असलेले आधार केंद्र सुरू करण्याची मागणी केली जात आहे
