मोटार सायकल चोरीला : पिंपरखेड येथील घटना !




शिरूर, दि. 12 जुलै : (प्रतिनिधी अर्जुन शेळके)


मोटार सायकल चोरीला जाण्याच्या घटनेची पुनरावृत्ती झाली आहे.शिरुर तालुक्यात दिनांक 3/7/2023 रोजी रात्री 8/30 वाजण्याच्या सुमारास पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे गावच्या हद्दीत ग्रामपंचायतीच्या कोप-यावर हॅण्डल लॉक न करता लावलेली संतोष दादाभाऊ पोखरकर, वय- 47 वर्षे, धंदा- शेती, रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे मो.9822983127 यांची होडा शाईन MH12 RJ2398 किं. रू. 40,000/- ची दुचाकी ही कोणीतरी अज्ञात चोरटयाने चोरून नेली आहे.• मोटर सायकल चोरीला जाण्याच्या या घटनेत


चोरीला गेलेला माल -


• 40,000/- रू. किंमतीची होंडा कंपनीची शाईन मोटार सायकल नं. MH12 RJ2398 तिचा चॅसी नं. ME4JC65AHJ7 179088 व इंजिन नं. JC6572279966 असा असलेली, जु. वा. किं. अं.

-40,000/-.मोटार सायकल चोरीला जाण्याच्या या घटनेत फिर्यादी संतोष दादाभाऊ पोखरकर, वय- 47 वर्षे, धंदा- शेती, रा. पिंपरखेड, ता. शिरूर, जि. पुणे मो.9822983127 यांनी अज्ञात चोरटयाविरूध्द फिर्याद शिरूर पोलीस स्टेशनला दाखल केली आहे. शिरूर पोलिसांनी अज्ञात चोरट्याविरुद्ध भा.द.वी. का. क. 379 नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे.पुढील तपास पोलीस नाईक श्री. धनंजय थेउरकर हे करत आहे. तर दाखल अंमलदार पोलीस नाईक वाडेकर हे प्रभारी अधिकारी A.P.I. यादव यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहेत.

Post a Comment

Previous Post Next Post