शिरूर येथील पत्रकार स्व. आप्पासाहेब रंगनाथ ढवळे यांच्या दशक्रियेदिनी सामाजिक बांधिलकीतून पत्रकार बांधवांसह अनेकांची आर्थिक मदत




प्रतिनिधी अर्जुन शेळके


शिरूर शहरातील जुने पत्रकार स्व. आप्पासाहे रंगनाथ ढवळे यांचे बुधवार दि. ५ जुलै २०२३ रोजी अल्पश: आजाराने अकाली निधन झाले होते. त्यांचा दशक्रिया विधी मंगळवार दि. ११ जुलै २०२३ रोजी शिरूर येथे झाला. ढवळे यांनी आपल्या शेवटच्या श्वासापर्यंत पत्रकारिता केली. परंतु मान मिळत असला तरी धनाची चिंता न करता त्यांनी आपल्या खडतर जीवनात पत्रकारितेला आपल्या शेवटच्या क्षणापर्यंत जोपासलेले होते. वयाच्या अवघ्या ५३ व्या वर्षी त्यांचे अकाली निधन झाल्याने समाजातील सर्वच स्तरातून हळहळ व्यक्त होत असुन, पत्रकार बांधव व सामाजिक बांधिलकीची जाण असणाऱ्या काही ज्ञात - अज्ञात व्यक्तींनी या कुटुंबाला आर्थिक मदत केली. त्यात म रा म पत्रकार संघाचे जिल्हाध्यक्ष सीताराम लांडगे, शिरूर न पा चे नगरसेवक अभिजित पाचर्णे, पोलीस अंमलदार प्रवीण पिठले, पत्रकार अर्जुन बढे, पत्रकार बाळासाहेब ढोबळे, पत्रकारसंतोष शिंद, पत्रकार भाऊसाहेब खपके, पत्रकार बबन वाघमारे, पत्रकार प्रवीण गायकवाड, पत्रकार अनिल सोनवणे, पत्रकार मंदार तकटे, पत्रकार रवींद्र खुडे, पत्रकार ज्ञानेश्वर मिडगुले, पत्रकार शेरखान शेख, उद्योजक श्रीहरी नरवडे, शिरूर ग्रामीणचे मा. सरपंच विठ्ठल घावटे, मा नगरसेवक अबिद शेख, शिवसेनेचे शहर प्रमुख सुनील जाधव, शिरूर न पा शिक्षण मंडळाचे माजी सभापती निलेश खाबिया, राजू ढवळे, पतीत पावन संघटनेचे नारायण देशमाने, शिरूरचे पोष्ट मास्तर अमोल साळवे, ईच्छापुर्ती श्री साईबाबा पालखी सोहळा समिती मंडळ शिरूर, आर पी आय चे निलेश जाधव आदींनी आर्थिक मदत केली. त्याचा धनादेश दशक्रिया विधिवेळी प्रवचनकार ह भ प संतोष महाराज कौठाळे यांच्या हस्ते आप्पासाहेब ढवळे यांचे वडील श्री रंगनाथ ढवळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आलाआप्पासाहेब ढवळे यांचे वडील श्री रंगनाथ ढवळे यांच्याकडे सुपूर्द करण्यात आला..पत्रकार अर्जुन बढे, पत्रकार रवींद्र खुडे, पारनेरचे पत्रकार भगवान श्रीमंदीलकर, रमेश गायकवाड सर, शिरूर ग्रामीणचे माजी सरपंच विठ्ठल घावटे आदींनी श्रद्धांजली अर्पण करताना पत्रकार ढवळे यांच्या बद्दलच्या आठवणी व्यक्त केल्या.


दशक्रिया विधीनिमित्त सर्वच क्षेत्रातील दुःखांकीतांसह पत्रकार धर्मा मैड, अनिल सोनवणे, योगेश देशमुख तसेच ढवळे कुटुंबीयांचे आप्तेष्ट, नातलग व मित्रमंडळी बहुसंख्येने उपस्थित होते.

Post a Comment

Previous Post Next Post