शिकविण्याकरिता शिक्षकांच्या मागणीसाठी जि.प शाळेला ठोकले कुलूप"ठाकरे युवा सेना क्रमांक - शिक्षक न मिळाल्यास मुख्यमंत्र्यांना दाखवू काळे झेंडे"




"एकवेळ फुकटची खिचडी नाही दिली तरी चालेल परंतु शिकवायला शिक्षक द्या विद्यार्थिनीची प्रशासनाला विनंती : समृद्धी दीक्षित"


 प्रदीप पट्टेबहादूर - 


 वाशिम ; मंगरूळपीर येथील जिल्हा परिषद शाळेतील शिक्षकांची तब्बल २१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे हजारो गोरगरिबांच्या विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे. ही बाब लक्षात घेत उद्धव बाळासाहेब ठाकरे  गटाच्या युवासेने आक्रमक पवित्र घेऊन शिक्षकांची पदे भरण्याकरिता मागणीसाठी मंगरूळपीर येथे दिनांक 12 जुलै रोजी ताला ठोको आंदोलन केले. शिवाय रिक्त पदे तातडीने न भरल्यास मुख्यमंत्र्यांना यांना काळे दाखवण्यात येतील असा इशारा तहसीलदारांना निवेदनाद्वारे देण्यात आले. मंगरूळपीर जिल्हा परिषद प्राथमिक व उच्च माध्यमिक शाळेतील जवळपास १४०० विद्यार्थी शिक्षण घेत आहेत. या शाळेत पाचवी ते बारावीपर्यंत ४४ शिक्षकांची पदे असतात. केवळ १९ शिक्षक उपलब्ध आहेत. तर आता ४ शिक्षकांची प्रतिनियुक्ती करण्यात आली. परंतु या ठिकाणी शिक्षकांची २१ पदे रिक्त आहेत. त्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांचे शैक्षणिक विभक्त धोक्यात आले आहेत. ही गंभीर बाब लक्षात घेऊन युवा सेनेच्या कार्यकर्त्यांकडून मंगरूळपीर येथे जिल्हा परिषद शाळेतील ताला ठोका आंदोलन करण्यात आले.



 शिक्षकांचे सर्व रिक्त पदे भरावी किंवा प्रतिनियुक्तीवर अध्यापणातील शिक्षक नेमून घ्यावे अशी मागणी यावेळी युवा सेनेकडून करण्यात आली. आंदोलन विधानसभा संपर्कप्रमुख विवेक नाकाडे, कॅप्टन प्रशांत सुर्वे, युवा सेना जिल्हाप्रमुख जुबेर मोहनवाले, शिवसेना शहर प्रमुख सचिन परळीकर, युवती सेना जिल्हाप्रमुख प्रिया महाजन, युवा सेना विधानसभा प्रमुख अर्जुन सुर्वे ,जिल्हा सचिव गजानन ठेंगडे ,राजा भैया पवार, अंकित तेली, शुभम राठोड ,कॉलेज कक्षा युवा सेना शहर प्रमुख सुनील कुर्वे,विश्वास गोदमाले, सोनू जैस्वाल, रवी गोदलकर, संदीपान भगत, सुमेर शेख, अजय भालेराव, सचिन राऊत, आधी सह युवा सेना शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते..



जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मंगरूळपीर येथील शिक्षकांचे पदे रिक्त आहेत येथे 25 पदे वित्त असताना चार शिक्षक प्रतिनियुक्त करण्यात आले आहे अद्यापही 21 पदे रिक्त आहेत ही गंभीर बाब लक्षात घेऊन रिक्त पदांबाबत प्रशासनाला वारंवार लेखी पत्र दिले आहेत.


एस.पी. टीक्कस

प्राचार्य

 जि.प प्राथमिक शाळा मंगरूळपीर



प्रथम क्रमांकावर एकमेव असलेल्या मंगरूळपीर जिल्हा परिषद हायस्कूलची अवस्था शिक्षकांच्या रिक्त पदामुळे दैनंदिन झाली आहे. यामुळे विद्यार्थ्यांचे शैक्षणिक नुकसान होत आहे.त्यातून गोरगरिबांचे मुले हे वंचित राहत आहेत. प्रशासनाने रिक्त पदे तात्काळ न भरल्यास पालकांच्या वतीने तीव्र आंदोलन छेडण्याचा इसरा दिला. 


दशरथ पवार -

विद्यार्थी पालक


आज रोजी आम्हाला शिकायला शिक्षक नाही. आमच्या स्वपणाचा बट्याबोल होत आहे. की काय असा प्रश्न आम्हाला उपस्थित होत आहे. एक वेळचे फुकटची खिचडी नाही दिली तरी चालेल.  परंतु शिकवायला शिक्षक द्या..? 


समृद्धी दीक्षित -

विद्यार्थिनी वर्ग १० वा

जि.प.शाळा मंगरूळपीर

Post a Comment

Previous Post Next Post