वाशिम प्रतिनिधी / प्रदिप पत्तेबहादुर
स्थानिक ; स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम तर्फे सेवाभावी वृत्तीने अनेक कार्य केले जातात त्याचाच भाग म्हणून दिनांक 18 जुलै 2023 रोजी संस्थेतर्फे जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोप तालुका रिसोड जिल्हा वाशिम येथे शालेय साहित्याचे वाटप करण्यात आले. त्यात गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना वही पुस्तक,पेन व पेन्सिल अ
शालेय साहित्य अगदी मोफत वाटप करण्यात आले. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा मोप येथे जवळपास 200 विद्यार्थी शिक्षण घेतात त्यापैकी 187 विद्यार्थ्यांना या शैक्षणिक साहित्याचे वाटप करण्यात आले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून जिल्हा परिषद शाळा मोपचे मुख्याध्यापक श्री डहाळे सर हे उपस्थित होते तर प्रमुख अतिथी म्हणून स्व. लक्ष्मीबाई गायकवाड बहुउद्देशीय संस्था वाशिम चे कोषाध्यक्ष प्रा. हरिदास बाजड, संस्थेचे उपाध्यक्ष श्री हेमंत गायकवाड हे होते.
श्री बाजड यांनी शिक्षण ही काळाची गरज आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी शिक्षण घेणे आवश्यक आहे यापुढे शिक्षणाशिवाय पर्याय नाही. शिक्षणाने माणूस सुसंस्कृत होतो परंतु शिक्षण घेत असताना परिस्थिती गरीब असली तरी आपल्या प्रयत्नाच्या जोरावर कोणताही विद्यार्थी यशस्वी होऊ शकतो असे मार्गदर्शन केले. तर श्री हेमंत गायकवाड यांनी आमची संस्था ही अशा प्रत्येक विद्यार्थ्याला पुढे जाण्यासाठी मदत करण्यासाठी कटिबद्ध आहे याची ग्वाही दिली. यापुढेही संस्था अशा प्रकारचे कार्य संस्था अध्यक्षा ॲड.वर्षा गायकवाड यांच्या मार्गदर्शनाखाली करीत राहील असे सांगितले. कार्यक्रमाचे अध्यक्ष मुख्याद्यापक श्री डहाळे सर यांनी संस्थेचे हे कार्य अतिशय स्तुत्य असून यामुळे गरीब व होतकरू विद्यार्थ्यांना मदतीचा हात मिळाला असल्याचे प्रतिपादन केले व संस्थेला पुढील कार्यासाठी शुभेच्छा दिल्या.
या कार्यक्रमाला जिल्हा परिषद शाळेतील शिक्षक श्री शर्मा सर, श्री नरवाडे सर,सुर्वे मॅडम,
तुरुकमाने मॅडम व श्री भागवत नरवाडे सर यांची उपस्थिती होती.
कार्यक्रमाचे संचालन श्री सचिन शर्मा सर यांनी तर आभार प्रदर्शन श्री भागवत नरवाडे सर यांनी केले.
