कर्जत प्रतिनिधी:- दिलीप अनारसे
करोनाने आपल्याला सर्वात मोठा धडा शिकविला आहे. मदतरूपी देवकार्याला कुठलाही धर्म नसतो. धर्म किंवा धर्मग्रंथ कोणताही असो तो इतरांच्या उपयोगीच पडण्याचा संदेश देतो. माणसाने माणुसकी जपणे यापेक्षा मोठा धर्म नाही. हाच माणुसकीचा धर्म जपण्यासाठी वाट्टेल ती अडचण सोसेल, पण मी इतरांच्या उपयोगी अखेरपर्यंत येत राहील..'.कर्जत तालुक्यातील अंबिजळगाव येथील गावचे विद्यमान सरपंच विलास आप्पा निकत यांनी गावांमध्ये पैलवानांचा खेळ करण्यासाठी आलेल्या बीड जिल्ह्यातील कुटुंबाची काल झालेल्या रिमझिम पाऊसामुळे घरात पाणी साचले होते.त्यांना रात्रभर पाण्यात भिजत बसण्याची वेळ आली. लगेच गावातील नागरिकांनी सरपंच यांना मोबाईल वर संपर्क केला असता लगेचच या कुटुंबासाठी फोन पे वरुन पाच हजार रुपयाची मदत दिली. गावचे सरपंच म्हणजे गावचे कारभारी असतात. गावातील गरीब कुटुंबातील व्यक्ती च्या सुख दुःखात सहभागी होऊन लोकांना आधार देण्याचे काम गावचे सरपंच करत असतात म्हणून गावच्या विद्यमान सरपंच निकत यांनी या कुटुंबातील सर्व नातेवाईकांना केली पाच हजार रुपयाची मदत.परस्तिथी कोणाला सांगुन येत नसती म्हणून निकत यांनी समाज कार्य करण्याचे ध्येय हाती घेतले असून. गावातील कुठल्याही शैक्षणिक, धार्मिक, आध्यात्मिक, क्षेत्रात कोणालाही कसलीही मदत लागली तरी मी मदत करण्यासाठी प्रयत्न करीन.
