सेवानिवृत्त सुभेदार कैलास काळे यांचा मिरवणुकीने भव्य स्वागत
जय जवान संस्थेच्या वतीने सन्मान सोहळा संपन्न
निमगाव म्हाळुंगी (ता. शिरूर) — गावाचे भूषण व भारतीय लष्करातील 28 वर्षांची यशस्वी सेवा पूर्ण करून सेवानिवृत्त झालेले सुभेदार कैलास दादाभाऊ काळे यांचे निमगाव म्हाळुंगी येथे शानदार स्वागत करण्यात आले. जय जवान संस्था, निमगाव म्हाळुंगी यांच्या वतीने विशेष सत्कार समारंभाचे आयोजन करण्यात आले.
सुभेदार काळे यांच्या स्वागतासाठी गावातून मिरवणूक काढण्यात आली. श्री म्हसोबा महाराजांचे दर्शन घेऊन गावात आगमन करताच जय जवान संस्थेचे पदाधिकारी व ग्रामस्थांनी त्यांचे पुष्पगुच्छ व मानचिन्ह देऊन हार्दिक स्वागत केले.
कार्यक्रमात संस्थेचे अध्यक्ष सुभेदार रामचंद्र विधाटे, उपाध्यक्ष मेजर शिवले साहेब, सचिव सुभेदार मेजर चंद्रकांत आबा चव्हाण पाटील तसेच मेजर अनिल चव्हाण पाटील, संजय चव्हाण पाटील, दीपक चव्हाण, नंदाराम चव्हाण, लक्ष्मण कुसाळकर, गायकवाड साहेब, पवार साहेब, लांडगे साहेब, दौंडकर साहेब, विधाटे साहेब, व कुसाळकर साहेब आदी माजी सैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
गावाचे सरपंच, उपसरपंच, पोलीस पाटील, स्थानिक कार्यकर्ते, ग्रामस्थ, पाहुणे मंडळी व महिला-पुरुष ग्रामस्थांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत या सोहळ्याला एक वेगळीच उंची दिली.
कार्यक्रमाची सांगता देशभक्तीपर भाषणांनी व जय जवान संस्थेच्या उपक्रमांची माहिती देत करण्यात आली

