रांजणगावात पहाटेच्या सुमारास फिल्मी स्टाईलने जबरी चोरी! तीन दरोडेखोरांनी गाडी अडवून सोनं-रोखीसह पळ काढला

 रांजणगावात पहाटेच्या सुमारास फिल्मी स्टाईलने जबरी चोरी! तीन दरोडेखोरांनी गाडी अडवून सोनं-रोखीसह पळ काढला



रांजणगाव गणपती (शिरूर) –शंकर तिडके 

शिरूर तालुक्यातील रांजणगाव गणपती परिसरात आज (12 जुलै) पहाटे थरारक प्रकार घडला. सकाळी केवळ २० मिनिटांच्या आत तिघा अज्ञात इसमांनी थेट गाडी अडवून, धारदार शस्त्र दाखवत तब्बल ₹1,77,600 किमतीचे सोन्याचे दागिने आणि रोख रक्कम जबरीने लुटून नेली. ही घटना हॉटेल गार्गी समोर सकाळी 4:20 ते 4:40 दरम्यान घडली.


पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी अक्षय हनुमंत बोरगे (वय 26, राहणार उलवे, पनवेल) हे स्वतःच्या आय-20 कारने प्रवास करत असताना तिघा अज्ञात आरोपींनी त्यांची गाडी अडवली. दरवाजा उघडून चाकूसदृश हत्यार दाखवत बोरगे यांच्या ताब्यातील सोनं व रोख रक्कम जबरदस्तीने चोरून पळ काढला.


घटनेची माहिती मिळताच रांजणगाव पोलीस स्टेशनचे निरीक्षक एम.एस. वाघमोडे, PSI शिवाजी मुंडे, PSI अविनाश थोरात आणि DB पथक घटनास्थळी दाखल झाले. CCTV फुटेज मिळाले असून आरोपींचा शोध सुरू आहे. घटनास्थळी विविध तपास पथकांची नियुक्ती करण्यात आली असून अधिक तपास PSI शिवाजी मुंडे करत आहेत.


हा प्रकार पाहता रांजणगाव परिसरात दहशतीचं वातावरण पसरलं असून, दिवसाढवळ्या अशा फिल्मी स्टाईल लुटीने नागरिक भयभीत झाले आहेत.

पोलिसांकडून आवाहन घटनेबाबत कोणाकडेही माहिती असल्यास तात्काळ रांजणगाव पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा.

Post a Comment

Previous Post Next Post